AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रात्री झोपताना घरात शिंपडा हा द्रव पदार्थ, साप कधीच पुन्हा जवळ येणार नाही, सर्पमित्रांनी सांगितला रामबाण उपाय

अनेकदा झोपेत सर्पदंश होतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीला झोपेत साप चावतो, तेव्हा त्या व्यक्तीचा मृत्यू होण्याची शक्यता अधिक असते. कारण आपल्याला साप चावला आहे, हे त्या व्यक्तीला लवकर कळतच नाही. जेव्हा कळतं तोपर्यंत उपचारासाठी खूप उशिर झालेला असतो, अशा स्थितीमध्ये या व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकतो.

रात्री झोपताना घरात शिंपडा हा द्रव पदार्थ, साप कधीच पुन्हा जवळ येणार नाही, सर्पमित्रांनी सांगितला रामबाण उपाय
snake Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 14, 2026 | 7:09 PM
Share

पावसाळा सुरू झाला आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साप बिळाच्या बाहेर निघण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते, कारण पावसाळ्यात त्यांच्या बिळात पाणी जातं. त्यामुळे साप बिळातून बाहेर पडतात. अशावेळी ते नेहमी कोरड्या आणि सुरक्षित जागेचा शोध घेत असतात. जर तुमच्या घरात त्यांना अशी जागा मिळाली तर ते तिथे लपून बसतात. तुमचं थोडं जरी दुर्लक्ष झालं तरी देखील तुम्हाला अशा स्थितीत सर्पदंश होऊ शकतो. त्यामुळे कधीही आपल्या घरामध्ये पसारा होणार नाही याची काळजी घ्यावी, घर नेहमी स्वच्छ ठेवावं, तसेच तुमच्या परिसरात किंवा घराजवळ पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कधीही जास्त गवत वाढू देऊ नये. ज्यामुळे तुम्ही सापांपासून सुरक्षित राहाल.

भारतामध्ये सापांच्या हजारो प्रजाती आढळून येतात, परंतु त्यातील सर्वच साप हे काही विषारी नाहीत. त्यापैकी काही सापांच्या जातीच या विषारी आहेत, यामध्ये मण्यार, फुरसे, घोणस आणि नाग या चार जाती प्रचंड विषारी असतात. या चारही जाती महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात आढळून येतात. यातील सापाची सर्वात धोकादायक जात म्हणजे मण्यार, कारण या सापाचं वैशिष्ट म्हणजे हे साप नेहमी रात्रीच्यावेळीच शिकारीसाठी बाहेर पडतात. अनेकदा तुम्ही झोपेत असताना ते तुमच्या अंथरुणांमध्ये देखील घुसतात. झोपेत तुम्ही बेसावध असतात. अशावेळी त्यांना धक्का लागला की धोका समजून ते तुम्हाला चावा घेतात. मण्यार सापाचे दात हे खूपच बारीक असतात, त्यामुळे आपल्याला काही चावलं आहे, हे देखील तुम्हाला कळत नाही. त्यामुळे उपचारासाठी उशिर होतो. हा साप अत्यंत विषारी असल्यामुळे उपचार लवकर न मिळाल्यास तुमचा मृत्यू देखील होतो. महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू हे मण्यार आणि घोणस या दोन सापांच्या चाव्यामुळे होतात.

झोपेमध्ये अशी दुर्घटना घडू नये, म्हणून त्यावर सर्पमित्रांनी एक खास उपाय सांगितला आहे. सापांना कधीही तीव्र वास सहन होत नाही. त्यामुळे काय करायचं कांदा, लसुण, अद्रक हे तीन पदार्थ एकत्र करून त्याचं द्रावण बनवायचं, त्यानंतर हे द्रावण एखाद्या फडक्याच्या मदतीने गाळून तुम्ही जिथे झोपता त्याच्या आसपास आणि घरात शिंपडल्यास साप पुन्हा त्या घरात येत नाही. साप तुमच्या जवळही येणार नाही, कारण या तीव्र वासाचा त्याला त्रास होतो. तसेच घरात झोपताना कधीही खाली जमिनीवर झोपू नका, नेहमी बेडवरच झोपावं, असा सल्ला देखील सर्पमित्रांनी दिला आहे.

Follow Us
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल