AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘आम्ही देखील कुंभला गेलो होतो, घटना वाढवून …,’ खासदार हेमा मालिनी यांनी काय केला आरोप

महाकुंभ येथील चेंगराचेंगरीवरुन उत्तर प्रदेश सरकारला समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी घेरले आहे अनेक बोचणारे सवाल केले आहेत. यावर काल सपाच्या खासदार जया बच्चन यांनी मृतदेहांना नदीत फेकल्याचा सनसनाटी आरोप केला होता. त्याला आता भाजपाच्या मथुरा येथील खासदार जया बच्चन यांनी उत्तर दिले आहे.

'आम्ही देखील कुंभला गेलो होतो, घटना वाढवून ...,' खासदार हेमा मालिनी यांनी काय केला आरोप
| Updated on: Feb 04, 2025 | 4:18 PM
Share

आम्ही देखील कुंभ मेळाव्याला गेलो होतो. आम्ही संगामावर स्नान देखील केले आहे. येथे चेंगराचेंगरीची घटना झालीय परंतू ती एवढी मोठी नव्हती. सर्वकाही मॅनेज करण्यात आले होते.मला यासंदर्भात इतके माहिती नाही. परंतू घटना इतकी मोठी नव्हती जेवढी ही वाढवून सांगितली जात आहे असा आरोप मथुरा येथील भाजपाचे खासदार हेमा मालिनी यांनी केला आहे. कालच समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन यांनी गंगेत अनेक मृतदेहांना टाकण्यात आल्याने हे संगमाचे पाणी अशुद्ध झाले असल्याचा सनसनाटी आरोप केला होता. त्यानंतर आता खासदार हेमा मालिनी या बचावासाठी उतरल्या आहेत.

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभ दरम्यान मौनी अमावस्येच्या दिवशी पहाटे शाही स्नानाच्या दरम्यान चेंगराचेंगरी होऊन ३० लोकांचा मृत्यू झाला होता. त्यासंदर्भात संसदेत आरोप प्रत्यारोप सरु आहेत. समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेश सरकार या दुर्घटनेतील मृतांचा आकडा लपवत असल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर त्यांच्या पक्षाच्या नेत्या खासदार जया बच्चन यांनी देखील त्याची री ओढत चेंगराचेंगरीतील मृतदेहांना नदीत टाकल्याचा आरोप केला होता.

आम्ही देखील कुंभला गेलो होतो. आम्ही संगमावर स्नान देखील केले. येथे दु:खद घटना घडली. परंतू एवढी मोठी नव्हती. सर्वकाही मॅनेज केले गेले, मला याच्या बाबत इतकी माहिती नाही परंतू घटना काही एवढी मोठी नव्हती जेवढी ती वाढवून चढवून सांगितली जात आहे अशा विधान भाजपाच्या खासदार हेमा मालिनी यांनी केली आहे.

त्या म्हणाल्या की उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या प्रयागराजला जाऊन पवित्र स्नान करणार आहेत. जर स्थिती मॅनेज झाली नसती तर पंतप्रधान तेथे गेले असते का? असा उलट सवालही हेमा मालिनी यांनी केले आहे. यावर बोलताना हेमा मालिनी म्हणाल्या की अखिलेश यांचे कामच चुकीचे बोलणे आहे. घटना घडली पण एवढी मोठी नाही असा हेका हेमामालिनी यांनी कायम ठेवला आहे. समाजवादी पार्टीचे अध्यक्ष उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपतीच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर चर्चेत सहभाग घेताना महाकुंभ येथील चेंगराचेंगरीतील मृतांच्या आकड्यांवरुन अनेक सवाल केले आहे.

Follow Us
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदेंनी सगळं सांगितलं!
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने एकच खळबळ
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
Eknath Shinde | चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीचा आदेश!
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
Raj Thackeray | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा; मोदींच्या मौनावर गंभीर सवाल
आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधान
Rohit Pawar | 'आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात
मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात; विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी
मुंबईत भीषण दुर्घटना! शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; सचिन अहिरांच्या प्रवेशानंतर शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही?
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ