AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाकुंभमधील चेंगराचेंगरीनंतर मृतदेहांना नदी टाकून दिले, खासदार जया बच्चन यांचा सनसनाटी आरोप

जगातील सर्वात मोठ्या धार्मिक सोहळ्याचे सर्व व्यवस्थापन लष्कराच्या हाती सोपवावी अशी मागणी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केली आहे. सरकारने कुंभमधील चेंगराचेंगरीतील मृत्यू झालेल्यांचे खरे आकडे द्यावेत असे त्यांनी म्हटले आहे.

महाकुंभमधील चेंगराचेंगरीनंतर मृतदेहांना नदी टाकून दिले, खासदार जया बच्चन यांचा सनसनाटी आरोप
जया बच्चन
| Updated on: Feb 03, 2025 | 6:27 PM
Share

महाकुंभमध्ये मौनी अमावस्येला झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतदेहांना नदीत टाकून दिल्याचा धक्कादायक आरोप समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. महाकुंभ मेळाव्यात शनिवारी पहाटे चेंगराचेंगरी होऊन ३० जण ठार झाले आहेत. ही आकडेवारी अनेक तासांनंतर जाहीर करण्यात आली होती. त्यावेळी या आकडेवारीच्या सत्यतेवरुन प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता खासदार जया बच्चन यांनी नदीत मृतदेहांना टाकून दिले तर पोस्टमार्टेमचा प्रश्न येतोच कुठे असा सवालही जया बच्चन यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. हे प्रेतं नदीतच टाकल्याने नदीचे पाणी खूपच प्रदुषित झाल्याचेही जया बच्चन यांनी म्हटले आहे.

समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन यांच्याशी काही चॅनलचे प्रतिनिधी बोलले. त्यावेळी जया बच्चन म्हणाल्या की आता सर्वात दूषित पाणी कुठे आहे. कुंभ मध्ये तेथे चेंगराचेंगरी झाली तेव्हा ज्या लोकांचे मृत्यू झाले त्यांचे मृतदेह नदीत फेकले गेले. त्यामुळे पाणी दूषित झाले आहे. या मुद्दयांवर कोणी बोलत नाही असेही त्या म्हणाल्या. समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन यांनी कुंभ मेळाव्यात आलेल्या लोकांच्या संख्येवरुन देखील सवाल केले आहेत. कुंभ मेळाव्याला आलेल्या श्रद्धाळूंना कोणतीही सुविधा दिली जात नाही.त्याच्यासाठी कोणतीही विशेष व्यवस्था नाही.तेथे कोट्यवधी लोकांनी भेट दिली असे खोटे सांगितले जात आहे. एवढी मोठी संख्या असलेले लोक एका जागी कसे एकत्र येऊ शकतात ? असा सवाल देखील त्यांनी केला आहे.

मृत्यू झालेल्यांचे खरे आकडे द्यावेत

जया बच्चन यांच्या वक्तव्यानंतर भाजपाचे नेते, धार्मिक संघटना आणि सोशल मीडिवर जया बच्चन यांच्याविरोधात टीका केली जात आहे. भाजपाने या हिंदू आस्था आणि कुंभ मेळ्याच्या अपमान म्हटले आहे. धार्मिक संघटनांनी आणि नेत्यांनी जया बच्चन यांनी माफी मागावी असे म्हटले आहे. जया बच्चन यांचे वक्तव्य दिशाभूल करणारे आणि असंवेदनशील आहे असा आरोप त्यांच्यावर केला जात आहे.या आधी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी देखील महाकुंभमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीबदद्ल अनेक प्रश्न केले आहेत. सरकारने कुंभमधील चेंगराचेंगरीतील मृत्यू झालेल्यांचे खरे आकडे द्यावेत. योगी आदित्यनाथ यांच्या सरकारवर टीका करताना अखिलेश यादव यांनी जगातील सर्वात मोठ्या धार्मिक कार्यक्रमाची सर्व व्यवस्थापन लष्कराच्या हाती सोपवावी अशीही मागणी केली आहे. तर उत्तर प्रदेश सरकारने हे सर्व दावे फेटाळत कुंभमध्ये स्वच्छता आणि सुरक्षा यांचा योग्य मेळ आहे. नदीत कोणतेही शव सापडलेले नाही असेही सरकारने स्पष्ट केले आहे.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...