AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आम्ही एक मशीद गमावली, आणखी काही गमावू इच्छित नाही…’, ओवेसी म्हणाले- लवकरच आंदोलनाची घोषणा

वक्फ दुरुस्ती विधेयकावरुन एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, वक्फचा मुद्दा हा सर्व मुस्लिमांचा मुद्दा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ मुस्लिमांना टार्गेट करत आहेत. लवकरच आपण याविरोधात आंदोलन छेडणार असल्याचं देखील त्यांनी म्हटले आहे.

आम्ही एक मशीद गमावली, आणखी काही गमावू इच्छित नाही...', ओवेसी म्हणाले- लवकरच आंदोलनाची घोषणा
shailesh musale
shailesh musale | Updated on: Sep 02, 2024 | 7:53 PM
Share

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी वक्फ दुरुस्ती विधेयकावरून मोदी सरकारवर टीका केलीये. या दुरुस्ती विधेयकाविरोधात त्यांनी आंदोलन करणार असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले की, आम्ही एक मशीद गमावली आहे. त्यामुळे लवकरच वक्फ वाचवण्यासाठी आंदोलनाची घोषणा करणार असल्याचे औवेसी यांनी सांगितले. ओवेसी यांनी म्हटले की, पंतप्रधान मोदी, तुम्हाला मुस्लिमांसाठी केंद्रीय वक्फ परिषद आणि राज्य वक्फ बोर्डात गैर-मुस्लिम सदस्य का बनवायचे आहेत? प्रत्येक धर्माला आपापला धर्म पाळावा लागतो हीच या देशाची ताकद आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ निवडणुकीत पराभूत होऊ नये म्हणून मुस्लिमांना टार्गेट करत आहेत.

वक्फचा मुद्दा केवळ मुस्लिमांचा नाही – ओवेसी

तेलंगणातील महबूबनगरमध्ये ओवेसी बोलत असताना म्हणाले की, वक्फचा मुद्दा देवबंदी, बरेलवी आणि अहल-ए-हदीसचा नसून संपूर्ण मुस्लिमांचा मुद्दा आहे. मला पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारायचे आहे की वक्फ तयार झाला तर माझ्या मालमत्तेचे संरक्षण कोणत्या कायद्याने केले जाईल?

‘हिटलरच्या काळात ज्यूंचे काय झाले…’

ओवेसी म्हणाले, हिटलरच्या काळात जर्मनीत ज्यूंना ज्याची पुनरावृत्ती झाली, आज त्याच गोष्टीची पुनरावृत्ती आपल्या देशातील मुस्लिमांसोबत केली जात आहे. भाजपचे लोक म्हणतात की, 8 लाख एकर जमीन वक्फची आहे, मग ऐका, ही जमीन कोणत्याही सरकार, आरएसएस, भाजप किंवा राजकीय पक्षाने दिली नसून आमच्या वडिलांनी दिली आहे. महाराष्ट्रात ज्यांनी एका वयोवृद्ध मुस्लीम माणसावर प्राणघातक हल्ला केला ते पोलिसात भरती होण्यासाठी परीक्षेला बसले होते, मुस्लिमांवर अत्याचार करणारे गुंड नेहमीच टोळक्याने येतात. अशी टीका ही त्यांनी केली.

अल्पसंख्याक कल्याण मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक सादर केले आहे. आता जेपीसीकडे ते पाठवण्यात आले आहे. विरोधी पक्षांकडून या विधेयकाला जोरदार विरोध होत आहे.  काही प्रमुख मुस्लीम संघटनांकडून वक्फ (दुरुस्ती) विधेयकावर तीव्र टीका होत असताना, भाजपची अल्पसंख्याक आघाडी वक्फ बोर्डातील सुधारणांसाठी मुस्लिमांकडून सूचना मागवणार आहे आणि त्या विधेयकाची तपासणी करणाऱ्या संसदीय समितीसमोर मांडणार आहे.

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता