Rahul Gandhi : धर्मेंद्र प्रधान यांचा खातेबदल नको, राजीनामाच हवा, राहुल गांधींनी ठणकावून सांगितलं

Rahul Gandhi : आज मी उपोषण करणाऱ्या विद्यार्थ्यांना भेटलो. त्यांची चळवळ, आरएसएस या विषयी चर्चा झाली. त्यांनी शिक्षण व्यवस्था ताब्यात घेतली आहे असा आरोप लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केला.

Rahul Gandhi : धर्मेंद्र प्रधान यांचा खातेबदल नको, राजीनामाच हवा, राहुल गांधींनी ठणकावून सांगितलं
Rahul Gandhi
| Updated on: Jul 25, 2026 | 12:11 PM

दिल्लीत आज राहुल गांधी यांनी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली. नंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. “आज मी उपोषण करणाऱ्या विद्यार्थ्यांना भेटलो. त्यांची चळवळ, आरएसएस या विषयी चर्चा झाली. त्यांनी शिक्षण व्यवस्था ताब्यात घेतली आहे” असा आरोप लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी केला. “मुख्य गोष्ट ही आहे की, विद्यार्थ्यांच्या तीन मुख्य मागण्या आहेत. त्यावर कुठलीही तडजोड होणार नाही हे स्पष्ट आहे. ही भारतातल्या विद्यार्थ्यांची मागणी आहे” असं राहुल गांधी म्हणाले.

“पहिली मागणी ही आहे की, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हवा. ते भ्रष्ट आणि अकार्यक्षम आहेत. सरकारकडून माहिती मिळतेय त्यानुसार मोदी कॅबिनेटमध्ये चर्चा आहे की, धर्मेंद्र प्रधान यांचा खातेबदल करावा. त्यांना दुसरं मंत्रालय द्यावं. ही मागणी आम्हाला अजिबात मान्य नाही” असं राहुल गांधी यांनी ठणकावून सांगितलं.

नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी

“धर्मेंद्र प्रधान यांचं शिक्षण खातं बदलून त्यांना दुसरीकडे हलवणं हे विद्यार्थ्यांना अजिबात मान्य नाही. मिस्टर प्रधान यांना हटवलचं पाहिजे असं राहुल गांधी म्हणाले. काल मी तुम्हाला दाखवलं एका मुलाला गोळी मारली. लाठी चार्जमध्ये हजारो मुलांची डोकी फुटली. पॅलेट मुलांच्या शरीरात आहेत. ज्यांनी कोणी केलं त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. या सगळ्याचा नेता नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी” अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.

राहुल गांधी यांच्या मागण्या काय

राहुल गांधी यांनी याच आठवड्यात नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाबाहेरही आंदोलन केलं होतं. जवळपास तीन तास त्यांनी आणि प्रियंका गांधींनी मोदींच्या घरासमोर ठिय्या मांडला होता. पोलिसांनी त्यांना तिथून उचलून नेलेलं. त्यांना ताब्यात घेतलेलं. शिक्षण व्यवस्थेच नुकसान झालं आहे. शिक्षण महाग झालं आहे. कुटुंबांना त्याची झळ सहन करावी लागत आहे. या सगळ्यावर संसदेत चर्चा झाली पाहिजे. आंदोलकांवर लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांना शासन झालं पाहिजे या राहुल गांधी यांच्या मागण्या आहेत.

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us