AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

West Bengal Eelection 2021 : भाजपचं ‘संकल्प पत्र’ जाहीर, ‘सोनार बांग्ला’ बनवण्याचं वचन

ज्या ठिकाणी भाजपची सत्ता आली तिथे भाजपने तातडीने जाहीरनाम्यातील घोषणांवर काम करायला सुरुवात केल्याचा दावा अमित शाह यांनी केलाय. आमच्यासाठी हा जाहीरनामा खूप महत्वाचा आहे आणि हे 'सोनार बांग्ला'चं संकल्पपत्र असल्याचं शाह म्हणाले.

West Bengal Eelection 2021 : भाजपचं 'संकल्प पत्र' जाहीर, 'सोनार बांग्ला' बनवण्याचं वचन
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांच्या हस्ते भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध
| Updated on: Mar 21, 2021 | 9:57 PM
Share

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते भाजपचं संकल्प पत्र जाहीर करण्यात आलं आहे. यावेळी बंगाल भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष, कैलास विजयवर्गीय, बाबुल सुप्रियो, दिनेश द्विवेदी यांच्यासह भाजपचे प्रमुख नेते उपस्थित होते. ज्या ठिकाणी भाजपची सत्ता आली तिथे भाजपने तातडीने जाहीरनाम्यातील घोषणांवर काम करायला सुरुवात केल्याचा दावा अमित शाह यांनी केलाय. आमच्यासाठी हा जाहीरनामा खूप महत्वाचा आहे आणि हे ‘सोनार बांग्ला’चं संकल्पपत्र असल्याचं शाह म्हणाले.(BJP’s manifesto released by Union Home Minister Amit Shah)

“संकल्प पत्रात फक्त घोषणा नाहीत, तर संकल्प आहे जगातील सर्वात मोठ्या पक्षाचा, देशात 16 पेक्षा जास्त राज्यात सत्तेत असलेल्या पक्षाचा, हा संकल्प आहे त्या पक्षाचा जो सलग दोन वेळा पूर्ण बहुमताने सत्तेत आला आहे. या संकल्प पत्राचा मूळ उद्देश सोनार बांग्ला आहे”, असं अमित शाह यांनी म्हटलंय.

भाजपने आपल्या जाहीरनाम्यात महिला, शेतकरी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मच्छिमारांसाठी महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. त्याचबरोबर पश्चिम बंगालमधील शेतकऱ्यांसाठी शेतकरी सन्मान निधीचा पैसा देण्याचं वचन भाजपने दिलं आहे.

भाजपच्या संकल्पपत्रातील महत्वाचे मुद्दे :

>> महिलांना नोकरीत 33 टक्के आरक्षण

>> शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान निधीद्वारे 18 हजार रुपये, त्यानंतर केंद्राचे वर्षाला 6 हजार रुपये, त्यात राज्याचे 4 हजार रुपये जोडून एकूण 10 हजार रुपये

>> पहिल्या कॅबिनेटमध्ये बंगालमधील सर्व गरीबांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ

>> मच्छिमारांना वार्षिक 6 हजार रुपये

>> घुसखोरीवर पूर्णपणे लगाम लावला जाणार

>> नागरिकता संशोधन विधेयक पहिल्या कॅबिनेटमध्ये लागू होणार

>> ओबीसी आरक्षणात समुहांना जोडले जाईल

>> सर्व मुलींना केजी टू पीजी मोफत शिक्षण

>> सार्वजनिक वाहतुकीत महिलांना मोफत प्रवास

>> भूमिहीन शेतकऱ्यांना वर्षाला 4 हजार रुपये

>> 3 नवे एम्स रुग्णालय उभारले जाणार

>> प्रत्येक परिवारातील कमीत कमी एकाला नोकरी

>> सातवा वेतन आयोग लागू करणार

>> मुख्यमंत्री कार्यालयाअंतर्गत एन्टी करप्शन हेल्पलाईन

>> प्रत्येक घरात शौचालय आणि पिण्याचे स्वच्छ पाणी

>> 11 हजार कोटी रुपयांचा सोनार बांग्ला फंड

>> विधवा पेन्शन 1 हजार रुपयावरुन 3 हजार रुपये

>> गरीब आणि अनुसूचित जातीतील महिलांना विशेष शिष्यवृत्ती

संबंधित बातम्या :

मोठी बातमी ! मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांची भूमिका साकारणारे अरुण गोविल यांचा भाजपात प्रवेश

West Bengal Election 2021 : सोनारपुरात भाजप कार्यकर्त्याची हत्या, घाटालमध्ये उमेदवाराला बुटाने मारहाण!

BJP’s manifesto released by Union Home Minister Amit Shah

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.