भाषणातून तृणमूलची निराशा स्पष्ट दिसून येतीये, आता जनतेचा निर्धार…, धर्मेंद्र प्रधान यांचा जोरदार हल्लाबोल

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचार रंगात आला असून तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपाचं राजकारण रंगताना दिसत आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी तृणमूल काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

भाषणातून तृणमूलची निराशा स्पष्ट दिसून येतीये, आता जनतेचा निर्धार..., धर्मेंद्र प्रधान यांचा जोरदार हल्लाबोल
dharmendra pradhan
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 22, 2026 | 9:45 PM

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचार रंगात आला असून, तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. पश्चिम बंगालमध्ये सध्या तृणमूल काँग्रेसची सत्ता आहे, मात्र यावेळी ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने देखील आपली संपूर्ण ताकद पणाला लावण्याचं दिसून येत आहे. त्यामुळे आता पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसविरोधात भाजप असा हा थेट सामना असणार आहे. दरम्यान तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री ‘नारी शक्ती’बद्दल सातत्याने बोलत आहेत. परंतु ते फक्त महिला सक्षमीकरणाचा आव आणत आहेत, कॅमेऱ्यांसमोर नाटक करत आहेत, असं त्यांनी म्हटलं होतं. या टीकेला आता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

नेमकं काय म्हणाले धर्मेंद्र प्रधान? 

ज्या पद्धतीची भाषा बोलली जात आहे, त्यावरून तृणमूल नेतृत्वाची निराशा स्पष्टपणे दिसून येत आहे. निवडणूक प्रचारात धमक्या दिल्या जात आहेत, चिथावणीखोर वर्तन दिसून येत आहे. जेव्हा या सगळ्या गोष्टी घडताना दिसतात तेव्हा या राजवटीमध्ये पश्चिम बंगालच्या जनतेनं खूप सोसलं आहे, त्रास सहन केला आहे, यावर शिक्कामोर्तब होतं, असं धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे. दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आपल्या भाषणांमधून सुरक्षा आणि एका चांगल्या प्रशासनाबद्दल आपले विचार मांडत आहेत, मात्र त्यावर आलेली अभिषेक बॅनर्जी यांची प्रतिक्रिया म्हणजे पोकळ धमकीच आहे. यातून हेच स्पष्ट होतं की आता पश्चिम बंगालला एका चांगल्या राजकीय संवादाची गरज आहे, धमक्याची नाही. पश्चिम बंगालला एका चांगल्या नेतृत्वाची गरज आहे, राजकीय बळाच्या प्रदर्शनाची नाही. बंगालची जनता हे सर्व बारकाईने पाहत आहे, जनतेनं भीतीचं राजकारण नाकारून लोकशाहीच्या माध्यमातून बदल घडवून आणण्याचा निर्धार केला आहे, असं यावेळी धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे.

 

भाजप आणि तृणमूलमध्ये लढत  

दरम्यान पश्चिम बंगालमध्ये यावेळी तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्येच प्रमुख लढत असल्याचं पहायला मिळत आहे. तृणमूलकडून आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. तर दुसरीकडे राज्यात विजय मिळवण्यासाठी भाजपने देखील आपली ताकद पणाला लावली आहे.

 

 

 

Follow Us