AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बांगलादेश-भारत सीमेवर नक्की चाललंय काय? थेट बांगलादेशातून 20 जण आले आणि एका…

भारत-बांगलादेश सीमेवरून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सीमेजवळील एका गावात भारतीय नागरिकाचं अपहरण झाल्याचे समोर आलं आहे.

बांगलादेश-भारत सीमेवर नक्की चाललंय काय? थेट बांगलादेशातून 20 जण आले आणि एका...
| Updated on: Aug 10, 2026 | 11:33 AM
Share

पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी जिल्ह्यातील भारत-बांग्लादेश सीमेजवळ भयंकर प्रकार समोर आला आहे. एका भारतीय चहा उत्पादक शेतकऱ्याचं अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही संपूर्ण घटना राजगंज ब्लॉकच्या कुकुरजान भागात घडली आहे. दीपांकर गोप असे 35 वर्षीय शेतकऱ्याचे नाव आहे. दीपांकर हा चौलाहाटी गावातील तसर पाड्यावर राहत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, दीपांकर यांना बांगलादेशातून बेकायदेशीर मार्गातून आलेल्या वीस जणांनी दीपांकरचं अपहरण केल्याचा आरोप पीडित कुटुंबीयांनी केला आहे. काही दिवसांपूर्वीच चौलहाटी सीमेजवळ एका बांग्लादेशी नागरिकाने भारतात घुसण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी स्थानिक नागरिक आणि BSF जवानांनी पकडून बांगलादेशी नागरिकाला पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं.

ताब्यात घेतलेल्या बांगलादेशी नागरिकाचं तस्करी करणाऱ्या टोळीशी कनेक्शन असक्याचा संशय स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे. या बांगलादेशीला ताब्यात घेतल्यानंतर शेतकरी दीपांकरचं देखील अपहरण झाल्याचा दावा केला जात आहे. परंतु या प्रकरणाच्या तपासानंतर अधिकृत माहिती समोर येईल.

त्या दिवशी नेमकं काय घडलं?

दीपांकरने शनिवारी सकाळी सीमेजवळील चहाच्या मळ्यात कामाला गेला. दीपांकर हा शेतात किटकनाशक फवारणी करत होता. त्याचवेळी 20 बांगलादेशीच्या गटाने बेकायदेशीररित्या भारतात घुसले. त्यानंतर शेतात काम करणाऱ्या दीपांकरला घेरलं. त्यावेळी दीपांकरने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला.

घटनास्थळी बांगलादेशी आणि दीपांकर यांच्यामध्ये झटापट देखील झाली. परंतु संख्येने जास्त असलेल्या बांगलादेशींसमोर दीपांकर फार काही करू शकला नाही. त्यानंतर दीपांकरला सीमा पार करून बांगलादेशच्या पंचगढ जिल्ह्यात नेण्यात आलं, असा दीपांकरच्या कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे. दीपांकरच्या अपहरणामुळे ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमले आहेत. या घटनेची माहिती मिळताच BSF जवान घटनास्थळी पोहोचले आहेत. या शेतकऱ्याला पुन्हा भारतात आणण्याचा प्रयत्न सुरू झाल्याची माहिती मिळतेय. यावरून दोन्ही देशांच्या सीमा सुरक्षा यंत्रणाच्या प्रतिनिधींची बैठक झाल्याची देखील माहिती समोर आली आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणा दीपांकरला भारतात आणण्याचे प्रयत्न करत आहेत.

Follow Us
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडी..
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडीचे निर्देश
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या...
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या चरणी विशेष प्रार्थना
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकरी...
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकऱ्यांचा आक्रोश
कणाहीन निवडणूक आयोगाची चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमार...
निवडणूक आयोगाचीच चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमारांना घेरलं
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे...
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली महत्त्वाची माहिती
राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा; ‘वेळ आल्यावर...
Rahul Gandhi : राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा; ‘वेळ आल्यावर... नेमकं प्रकरण काय?
मुख्यमंत्री फडणवीस अमरावती वाशिम दौऱ्यावर दुष्काळी परिस्थितीचा घेणार..
मुख्यमंत्री फडणवीस अमरावती वाशिम दौऱ्यावर दुष्काळी परिस्थितीचा घेणार आढावा
ज्ञानेश कुमार यांच्यामागचा बॉस कोण? संजय राऊतांनी सरळ नावचं सांगून...
ज्ञानेश कुमार यांच्यामागचा बॉस कोण? संजय राऊतांनी सरळ नावचं सांगून टाकलं
अशोक उईकेंचं अभिजीत दीपकेंना थेट आव्हान; आश्रमशाळ मुद्द्यावरून...
अशोक उईकेंचं अभिजीत दीपकेंना थेट आव्हान; आश्रमशाळांच्या मुद्द्यावरून मोठा वाद