AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पश्चिम बंगालमध्ये मोठी राजकीय घडामोड; काँग्रेसच्या उमेदवाराला अटक, ममता बॅनर्जींनी दिला होता पाठिंबा

पश्चिम बंगालमध्ये मोठी राजकीय घडामोड घडताना दिसत आहे. पोलिसांनी काँग्रेसच्या उमेदवाराला अटक केली आहे. काही तासांपूर्वीच ममता बॅनर्जींनी पाठिंबा दिला होता.

पश्चिम बंगालमध्ये मोठी राजकीय घडामोड; काँग्रेसच्या उमेदवाराला अटक, ममता बॅनर्जींनी दिला होता पाठिंबा
West bengal news Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 18, 2026 | 7:36 PM
Share

पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी घडामोडी घडू लागल्या आहेत. ममता यांच्या पक्षाच्या उमेदवाराने माघार घेतल्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. त्यानंतर काही वेळातच पश्चिम बंगाल पोलिसांनी काँग्रेसच्या उमेदवाराला अटक करण्यात आली आहे. एका जुन्या प्रकरणात काँग्रेसला उमेदनवाराला अटक करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमधील या घडामोडीची संपूर्ण देशात चर्चा होऊ लागली आहे.

पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या गटातील संचिता प्रधान डे या यांनी शुक्रवारी शुभेंदू अधिकारी यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पोटनिवडणुकीतून माघार घेतली. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस उमेदवार मिलन प्रधान यांना पाठिंबा दिला होता. या निर्णयावरून भाजपने ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका झाली होती. संचिता प्रधान डे या पेशाने शिक्षिका आहेत.

संचिता यांनी शुक्रवारी पतीसोबत मुख्यमंत्री अधिकारी यांच्याशी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पोटनिवडणुकीतला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यांनी अर्ज मागे का घेतला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अर्ज मागे घेतल्याने ममता यांच्या पक्षाचा नंदीग्राममध्ये एकही उमेदवार राहिला नाही. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. ममता बॅनर्जी यांनी निवासस्थानी पत्रकार परिषद घेत मित्रपक्ष काँग्रेसला पाठिंबा दर्शवला. काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा दर्शवत इंडिया आघाडी मजबूत करण्याचा निश्चय केला. परंतु आता काँग्रेसच्या उमेदवाराला अटक करण्यात आली आहे.

ममता बॅनर्जींची आयोगावर टीका 

तत्पूर्वी, निवडणूक आयोगाने तृणमूल काँग्रेसचं चिन्ह गोठवलं आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयावरून ममता बॅनर्जी यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांनी हा लोकशाहीतील काळा दिवस असल्याची टीका केली. आयोगाने दिलेले नाव आणि चिन्ह अंतिम असल्याचे मानत नाही. खरंतर निवडणूक प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे. निवडणुकीसाठी उमेदवार आणि निवडणूक चिन्ह अंतिम झाले होते. त्यानंतर शेवटच्या काही दिवसांत निर्णय घेण्यात आला आहे, असं म्हणत ममता बॅनर्जी यांनी आयोगावर टीका केली.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं