AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पश्चिम बंगालमधून मोठी बातमी! या ठिकाणी पुन्हा मतदान होणार, निवडणूक आयोगाने का दिले निर्देश?

West Bengal Election : निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील 15 मतदान केंद्रांवर फेरमतदानाचे आदेश दिले आहेत. हे मतदान 2 मे रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत पार पडेल.

पश्चिम बंगालमधून मोठी बातमी! या ठिकाणी पुन्हा मतदान होणार, निवडणूक आयोगाने का दिले निर्देश?
Bengal RevotingImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: May 01, 2026 | 6:46 PM
Share

संपूर्ण देशात सध्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची चर्चा सुरू आहे. भारतीय जनता पार्टी आणि तृणमुल काँग्रेस यांच्यात सामना पहायला मिळत आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभेसाठी मतदान पार पडले असून आता 4 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. मात्र आता त्याआधी मोठी बातमी समोर आली आहे. निवडणूक आयोगाने काही ठिकाणी पुन्हा मतदान घेण्याचे निर्देश दिले आहेत. आता उद्या म्हणजेच 2 मे रोजी हे मतदान पार पडणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

15 केंद्रांवर पुन्हा मतदान

निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमधील दोन महत्त्वाच्या विधानसभा मतदारसंघांतील 15 मतदान केंद्रांवर 2 मे रोजी पुन्हा मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय जिल्हास्तरावर मतदान केंद्रनिहाय अहवाल आणि तक्रारींची तपासणी केल्यानंतर घेण्यात आला आहे. सर्व बूथ दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील आहेत. मगराहाट पश्चिम विधानसभा मतदारसंघातील 11 बूथवर पुन्हा मतदान होणार आहे. याशिवाय डायमंड हार्बर विधानसभा मतदारसंघातील 4 बूथवरही पुन्हा मतदान घेतले जाणार आहे. निवडणूक आयोगाने सांगितले की, मतदानादरम्यान झालेल्या गैरप्रकारांच्या तक्रारी आल्या होत्या, याबाबत तपासणी केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

फाल्टा विधानसभेत तपासणी सुरू

निवडणूक आयोगाने 15 मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान घेण्याची घोषणा केल्यानंतर निवडणूक आयोगाने आता इतर भागांवरही लक्ष वळवले आहे. आयोगाने सांगितले की 144-फाल्टा विधानसभा मतदारसंघाशी संबंधित तक्रारी आल्या होत्या, याची तपासणी सुरू असून अहवालाची प्रतीक्षा आहे. हा अहवाल मिळाल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा मतदानाची गरज आहे का हे स्पष्ट होणार आहे.

उद्या सकाळी 7 वाजल्यापासून मतदान

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, 15 बुथवर उद्या सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत होणार आहे. याआधी झालेले वोटिंग मतदान प्रतिनिधित्व कायदा, 1951 च्या कलम 58(2) अंतर्गत रद्द करण्यात आले आहे आणि नव्याने मतदान घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आता या मतदानासाठी आवश्यक ती तयारी केली जात आहे. मतदान शांततेत पार पडण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.

Follow Us
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101 अमेरिकन डॉलरचा..
Mumbai Cha Raja | हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101 अमेरिकन डॉलरचा हार, व्हिडीओ होतोय व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल