AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेल्वे प्रवासात अपर बर्थचे नियम काय आहेत ? प्रवास करण्याआधी जाणून घ्या

ट्रेनने प्रवास करताना अपर बर्थच्या प्रवाशासाठी वेगळे नियम आहेत. पाहूयात काय नेमके नियम आहेत.

रेल्वे प्रवासात अपर बर्थचे नियम काय आहेत ?  प्रवास करण्याआधी जाणून घ्या
BERTHImage Credit source: socialmedia
| Updated on: Feb 25, 2023 | 9:46 AM
Share

नवी दिल्ली :  रेल्वेने दररोज करोडो लोक प्रवास करीत असतात. रेल्वे प्रवास करताना कन्फर्म तिकीट मिळण्यासाठी 120 दिवस आधी तिकीट काढावी लागते. तुम्हाला एक दिवस अगोदर कधीही कन्फर्म तिकीट मिळणार नाही. तात्काळ तिकीटाने जादा पैसे भरून तातडीचा प्रवास करता येत असतो. अशा परिस्थितीत आरएसी आणि कन्फर्म तिकीट धारकांसाठी काय नियम आहेत. अपर बर्थच्या प्रवाशांसाठी देखील वेगळे नियम आहेत. चला पाहूयात नेमके काय नियम आहेत.

रेल्वे प्रवाशांना सणासुदीच्या काळात, विशेषत: ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये ट्रेनची तिकिटे आधीच बुक करावी जातात. मात्र, अनेक प्रवाशांना कन्फर्म तिकिटांसाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रतीक्षा करावी लागते. कन्फर्म तिकीट असलेले प्रवासी ट्रेनमध्ये येईपर्यंत, ज्या व्यक्तीचे तिकीट कन्फर्म झालेले नाही, असे प्रवासी अपर बर्थवरून प्रवास करू शकतात. पण अपरच्या बर्थच्या प्रवाशासाठी कोणते नियम आहेत हे तुम्हाला माहीत आहे का ? आज आम्ही तुम्हाला त्याच्याबद्दल सांगणार आहोत.

कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांना कोणत्याही समस्येचा सामना करावा लागू नये यासाठी भारतीय रेल्वेने अनेक मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत. ट्रेनच्या थर्ड एसी क्लास आणि स्लीपर सेक्शनमध्ये प्रत्येक केबिनमध्ये आठ आसने असतात. यातील दोन आसने एका बाजूला असून सहा आसने समोरासमोर असतात. अशा परिस्थितीत प्रवाशांसाठी काय नियम आहेत ते पाहूयात.

ट्रेनमध्ये झोपण्याची वेळ रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत असते

ट्रेनमधून रात्राचा प्रवास करण्यासाठी स्वतंत्र नियम आहेत. भारतीय रेल्वेने रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत झोपण्याची वेळ निश्चित केली आहे. म्हणजे ट्रेनच्या खालच्या सीटवर बसलेले लोक बर्थवर या वेळेत झोपू शकतात. अर्थात खालच्या आसनांवर कन्फर्म तिकीट मिळालेल्या प्रवाशांच्या संमतीशिवाय कोणीही खालच्या बर्थ वापर करू शकत नाहीत.

सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत वरच्या बर्थवरील व्यक्ती खालच्या सीटवर बसू शकते-

समजा ट्रेनचा प्रवास करताना प्रवाशाला वरच्या बाजूच्या अपर बर्थ कन्फर्म केला आहे आणि खाली बाजूच्या खालच्या सीटवर असलेल्या इतर दोन प्रवाशांना RAC तिकीट मिळाले आहे. लोअर बर्थवर प्रवाशांना बसण्यासाठी पुरेसी जागा नसते. येथेही हाच नियम लागू आहे. सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत वरच्या बर्थचा प्रवासी खालच्या सीटवर बसू शकतो, मात्र केवळ दोन RAC तिकीटधारकांना बसण्याची परवानगी आहे.

साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.