AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Air hostes : प्रवासी विमानातून उतरल्यानंतर एअर होस्टेस काय करतात? ऐकून हादरून जाल

तुम्ही अनेकदा विमान प्रवास केला असेल, विमान प्रवास म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर सर्वात आधी येते ती म्हणजे विमानातील सुंदर एअर होस्टेस. या एअर होस्टेसवर विमानातील प्रवाशांची फार मोठी जबाबदारी असते.

Air hostes : प्रवासी विमानातून उतरल्यानंतर एअर होस्टेस काय करतात? ऐकून हादरून जाल
air hostes Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 30, 2026 | 7:19 PM
Share

तुम्ही अनेकदा विमानातून प्रवास केलाच असेल, तुमचा विमान प्रवास अधिक आरामदायी व्हावा यासाठी एअर होस्टेस प्रचंड मेहनत घेत असतात. विमान प्रवासामध्ये तुम्हाला केवळ खाद्य पदार्थांचा पुरवठा करणं एवढंच एअर हेस्टेचं काम नसतं. तर तुमचा प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी व्हावा याची जबाबदारी देखील त्यांच्यावर असते. त्यासाठी त्या सदैव तत्परत असतात. एअर होस्टेस वारंवार प्रवाशांना सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सूचना देखील करत असतात, तसेच प्रवासादरम्यान एखाद्या प्रवाशाला अडचण आली तर त्याला मदत देखील करतात. तुम्ही जेव्हा विमानाने प्रवास करता तेव्हा एअर होस्टेसकडे बघून तुम्हाला देखील त्यांच्या नोकरीचा नक्कीच हेवा वाटला असणार, आपण देखील एअर होस्टेस असतो तर किती चांगलं झालं असतं, असा विचारही अनेकांच्या मनात आलाच असेल, मात्र एअर होस्टेसची नोकरी वाटते तितकी नक्कीच सोपी नसते, त्यांच्यावर मोठी जबाबदारी असते.

तुम्ही जेव्हा तुमचा प्रवास संपल्यानंतर विमानातून खाली उतरता तेव्हा तुम्हाला असं वाटत असेल की आता एअर होस्टसची नोकरी देखील संपली त्या देखील त्यांच्या घरी जाऊन आराम करतील, परंतु तसं नसतं. उलट प्रवासादरम्यान एअर होस्टेसला जेवढी काम करावी लागत नाहीत त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने कामं त्यांना प्रवासी विमानातून खाली उतरल्यानंतर करावी लागतात. विमान लँड झाल्यानंतर सर्व प्रवासी विमानातून खाली उतरले आहेत का? कोणी विमानात तर राहिलं नाही ना? हे तपासण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. तसेच कोणी विमानात काही संशयास्पद वस्तू ठेवली तर नाही ना? याचा शोध देखील त्यांना घ्यावा लागतो. विमानाचा कोणा न कोणा त्यांना तपासावा लागतो.

एवढंच नाही तर विमान एखाद्या विमानतळावर लँड झाल्यानंतर असे अनेक विमानं असतात ते पुढच्या 30 मिनिटांमध्ये पुढील प्रवासासाठी उड्डाण करणार असतात, अशावेळी त्यांना विमानाची पुन्हा एकदा चेकिंग करावी लागते, तसेच विमानातील सीट प्रवाशांना बसण्यासाठी योग्य आहेत का? विमान स्वच्छ आहे का? या गोष्टींची काळजी देखील त्यांनाच घ्यावी लागते.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी