राजाचा मृत्यू सोनम गायब… मेघालयातील हनिमून कपलसोबत काय घडलं? 3 पुरूषांमुळे वाढला सस्पेन्स

हनिमून गेलेल्या कपलसोबत झालं तरी काय? पती राजाचा मृत्यू आणि पत्नी सोनम गायब... 'त्या' 3 पुरुषांमुळे प्रकरणातील वाढला सस्पेन्स... पोलीस याप्रकरणी कसून चौकशी करत आहेत.

राजाचा मृत्यू सोनम गायब... मेघालयातील हनिमून कपलसोबत काय घडलं? 3 पुरूषांमुळे वाढला सस्पेन्स
फाईल फोटो
| Updated on: Jun 08, 2025 | 1:53 PM

इंदूरहून मेघालयला भेट देण्यासाठी आलेल्या नवविवाहित जोडपं राजा रघुवंशी आणि त्याची पत्नी सोनम याचं प्रकरण आता गूढ आणि संशयाने वेढलं आहे. 23 मे रोजी राजा आणि सोनम गायब झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर 2 जून रोजी राजाचं मृतदेह दरीत सापडला, परंतु सोनमचा अद्याप कोणताही पत्ता लागलेला नाही. दरम्यान, मेघालयातील मावलाखियात भागातील स्थानिक गाईड अल्बर्ट पीडी यांनी एक मोठा दावा केला आहे. त्यांनी 23 मे रोजी राजा आणि सोनमला इतर तीन पुरुषांसोबत पाहिलं होतं. ते सर्वजण ट्रेकिंगसाठी गेले होतं आणि एकत्र 3 हजार पायऱ्या चढत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, चार पुरुष एकत्र पुढे चालत होते तर, सोनम एकटीच मागे चालत होती. ते हिंदीतून बोलत होते. पण गाईडला फक्त खासी आणि इंग्रजीच समजत होती, त्यामुळे त्यांच्यामध्ये बोलणं सुरु होतं ते गाईडला समजलं नाही. गाईडने असेही सांगितले की, एक दिवस आधी, 22 मे रोजी Nongriat ट्रेकसाठी जोडप्याला गाईड सेवा देऊ केल्या होत्या, ज्या त्यांनी दुसऱ्या गाईडकडून आधीच बुकिंग केल्याचं सांगून नाकारल्या. त्यानंतर कळलं की दोघांनी Bha Wansai नावाच्या एका गाईडची निवड केली आणि Shipara Homestay याठिकाणी रात्र घालवली. पण 23 मे रोजी ट्रेक करत असताना त्यांच्यासोबत कोणताच गाईड नव्हता.

गाईडने दिलेल्या माहितीनंतर प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवला आहे आणि त्याने दिलेल्या माहितीची पडताळणी केली जात आहे. शोध मोहिमेदरम्यान, 2 जून रोजी सोहरा परिसरातील विसावडोंग धबधब्याजवळील एका खोल दरीत राजा रघुवंशी यांचा मृतदेह आढळून आला. अत्यंत वाईट अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. राजाची सोन्याची अंगठी आणि साखळी गायब होती. ज्यामुळे लुटमारी आणि हत्या झाल्या शंका निर्माण होत आहे.

एका दिवसानंतर, त्याच भागातून रक्ताने माखलेला चाकू सापडला, तर दोन दिवसांनंतर, सीसीटीव्ही फुटेजनुसार सोनमने घातलेला काळा रेनकोट मोकमा गावात सापडला. हे गाव राजाचा मृतदेह सापडलेल्या ठिकाणाच्या आणि सोहरीरिमच्या मध्ये आहे. या जोडप्याची भाड्याने घेतलेली स्कूटी सोहरीरिममध्ये चाव्या न काढता पार्क केलेली आढळली.

पूर्व खासी हिल्सचे एसपी विवेक सियेम यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा परिसर खूपच दुर्गम आहे. भौगोलिक क्षेत्र खूप कठीण आणि आव्हानात्मक आहे, मुसळधार पाऊस, धुके आणि कमी दृश्यमानता यामुळे शोध मोहिमेवर परिणाम होत आहे. आमची टीम प्रशिक्षित स्निफर डॉग, ड्रोन आणि बचाव उपकरणं वापरून शोध कार्य करत आहे.

पोलिसांनी एसपींच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (SIT) स्थापन केलं आहे. त्यात चार डीएसपींचा समावेश आहे. यासोबतच एसडीआरएफ, एनडीआरएफ, गिर्यारोहक आणि स्थानिक लोकांच्या मदतीने शोध मोहीम सुरू आहे.