
साप हा मानवाचा मित्र आहे, तो शेतातील उंदीर खाऊन शेतकऱ्यांच्या पिकाचं संरक्षण करतो. साप हा विषारी असो अथवा बिनविषारी त्याला धोका जाणवल्यास तो आपल्यावर हल्ला करणारच हे नक्की, त्यामुळे सापांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो, मात्र तुम्ही जेव्हा सापांना जाणीवपूर्वक डिवचण्याच्या प्रयत्न करता, तेव्हा काय परिस्थिती निर्माण होऊ शकते, हे सांगणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक तरुण नागासोबत खेळत आहे. त्याने चक्क नागासमोरच नागीण डान्स सुरू केला. मात्र त्यानंतर जे घडलं, तो क्षण काळजाचा थरकाप उडवणारा होता. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तरुण नागा सारख्या विषारी सापाला न घाबरता त्याच्यासमोर बेफामपणे नागीण डान्स करतान दिसत आहे. हा तरुण या विषारी नागाला थोडं देखील घाबरत नाहीये, जसं की हा नाग त्याला काहीच करणार नाही. मात्र नाग तो नागच असतो. त्याला धोका जाणवल्यावर तो हल्ला करणारच.
हा तरुण नागासमोर डान्स करत आहे, आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यानंतर त्याने या नागाला आपल्या हातात पकडलं, आणि आपल्या गळ्यामध्ये घातलं. त्यानंतर सापानं या तरुणाला दंश केला. मात्र साप चावल्यानंतर देखील या तरुणानं सापासोबत खेळणं सुरूच ठेवलं. या व्हिडीओवर लाईक्स आणि केमेंटचा पाऊस पडत आहे.
⚠️: Don’t play with snakes
https://t.co/s9AjmmaM22— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) July 31, 2025
एक युजरने या व्हिडीओवर बोलताना म्हटलं आहे की, कृपया सापांबरोबर खेळू नका, त्यांनाही सुरक्षित राहू द्या आणि तुम्ही देखील सुरक्षित राहा. हा व्हिडीओ आतापर्यंत तब्बल 38 हजार जणांनी पाहिला आहे. एका दुसऱ्या युजरने म्हटलं आहे, कृपया असे जीवावर बेतनारे स्टंट करू नये, यामुळे तुमचा जीवही जाऊ शकतो. तर अनेक युजरने या तरुणाच्या अशा स्टंटबाजीवर नापसंती दर्शवली आहे.
डिस्क्लेमर: हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, याची कोणत्याही प्रकारची पुष्ठी किंवा समर्थन टीव्ही 9 करत नाही.