What India Thinks Today | सत्ताधाऱ्यांचाच नाही तर विरोधकांचा पण प्रबळ आवाज, सत्ता संमेलन ठरणार खास!

| Updated on: Feb 22, 2024 | 10:46 AM

What India Thinks Today | TV9 नेटवर्कच्या वार्षिक फ्लॅगशिप कॉन्क्लेव्हचा श्रीगणेशा होत आहे. व्हॉट इंडिया थिंक्स टुडे ग्लोबल समिट 2024, दिल्लीत सुरु होत आहे. 25 फेब्रुवारीपासून विचारांची खास शिदोरी प्रेक्षकांना मिळेल. India: Poised For The Next Big Leap या थीमवर हे समिट आयोजित करण्यात आले आहे. या तीन दिवसीय शिखर परिषदेत राजकारण, प्रशासन, अर्थव्यवस्था, आरोग्य, क्रीडा आणि कला या विषयांवरही चर्चा होणार आहे.

What India Thinks Today | सत्ताधाऱ्यांचाच नाही तर विरोधकांचा पण प्रबळ आवाज, सत्ता संमेलन ठरणार खास!
Follow us on

नवी दिल्ली | 22 February 2024 : व्हॉट इंडिया थिंक्स टुडे ग्लोबल समिट 2024, सत्ताधाऱ्यांचाच नाही तर विरोधकांचा प्रबळ आवाज ठरेल. भारताचे नंबर वन न्यूज नेटवर्क TV9 च्या या महामंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगभरातील दिग्गज सहभागी होत आहे. या तीन दिवसीय शिखर संमेलनाच्या अखेरच्या दिवशी, 27 फेब्रुवारी रोजी सत्ता समेंलन होत आहे. यामध्ये विविध राज्यातील मुख्यमंत्र्यासह विरोधी पक्षांचे नेते पण त्यांचे विचार मांडतील.

India: Poised For The Next Big Leap

टीव्ही9 नेटवर्कच्या वार्षिक फ्लॅगशिप कॉन्क्लेव्ह, व्हॉट इंडिया थिंक्स टुडे ग्लोबल समिट 2024 , दुसऱ्यांदा दिल्लीत सुरु होत आहे. 25 फेब्रुवारीपासून समिटचा श्रीगणेशा होत आहे. ‘India: Poised For The Next Big Leap’ या थीमवर हे शिखर संमेलन होईल. यामध्ये राजकारणासह प्रशासन, अर्थव्यवस्था, आरोग्य यावर पण चर्चा झडेल. यामध्ये खेळ आणि मनोरंजनावर खास चर्चा होईल. बिझनेस, स्टार्टअप, महिला सशक्तीकरण, जगात भारताचा प्रभाव, भारताच दबदबा यासह अनेक विषयावर पण जगभरातील दिग्गज त्यांचे विचार मांडतील.

हे सुद्धा वाचा

27 फेब्रुवारी रोजी सत्ताधाऱ्यांसह विरोधक एकाच मंचावर

व्हॉट इंडिया थिंक्स टुडेच्या तिसऱ्या दिवशी 27 फेब्रुवारी रोजी सत्ता संमेलनाचे आकर्षण असेल. यामध्ये विरोध गोटातून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि AIMIM चे अध्यक्ष अससुद्दीन ओवेसी विविध सत्रात Tv9 च्या महामंचावर त्यांचे विचार मांडतील. याशिवाय काँग्रेसचे नेते पवन खेडा शिखर संमेलनात सहभागी होतील. तर गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्यासह भाजपशासित अनेक राज्यातील मुख्यमंत्री सहभागी होतील.