What India Thinks Today : टीव्ही 9 चे व्यासपीठ सज्ज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जगभरातील मान्यवरांचे विचार ऐकण्याची संधी

भारतातील नंबर वन न्यूज नेटवर्क TV9 द्वारे 'व्हॉट इंडिया थिंक्स टुडे'ची या ग्लोबल कॉन्क्लेव्हचा दुसरा अंक राजधानीत साजरा होत आहे. 25 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या तीन दिवसीय कार्यक्रमाची थीम 'भारत : पुढची मोठी झेप घेण्यास सज्ज' अशी आहे. या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सह जगभरातील दिग्गज मंडळी उपस्थित राहून आपले विचार मांडतील.

What India Thinks Today : टीव्ही 9 चे व्यासपीठ सज्ज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जगभरातील मान्यवरांचे विचार ऐकण्याची संधी
What India Thinks Today : Globle summit 2024
Image Credit source: TV9MARATHI
| Updated on: Feb 22, 2024 | 8:38 PM

नवी दिल्ली | 21 फेब्रुवारी 2024 : टीव्ही 9 नेटवर्कचा वार्षिक सोहळा ‘व्हॉट इंडिया थिंक्स टु़डे ग्लोबल समिट 2024’ च्या दुसरे पुष्प आयोजित होत आहे. येत्या 25 फेब्रुवारीला देशाची राजधानी दिल्ली येथे या चर्चासत्राचे आयोजन होणार आहे. या सोहळ्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगभरातील दिग्गज आणि मान्यवर मंडळी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढविणार आहेत. या व्यासपीठावर प्रशासन, अर्थव्यवस्था, आरोग्य, संस्कृती आणि क्रीडा आदी अनेक महत्वाच्या विषयांवर आपले विचार व्यक्त करणार आहेत.

भारताचे नंबर वन नेटवर्क टीव्ही 9 याच्यावतीने सादर होणाऱ्या ‘व्हॉट इंडिया थिंक्स टु़डे ग्लोबल समिट 2024’ च्या दुसऱ्या पर्वाची तयारी पूर्ण झाली आहे. 25 ते 27 फेब्रुवारी असे तीन दिवस भरणाऱ्या परिषदेची थीम यंदा ‘India: Poised For The Next Big Leap’ ( भारत : पुढची मोठी झेप घेण्यासाठी सज्ज )अशी आहे. भारत जगाचे नेतृत्व करणार यावर ही थिम आधारित आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2047 पर्यंत भारताला समर्थ आणि सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीकोनाची झलक यावेळी पाहायला मिळणार आहे. 25 आणि 26 फेब्रुवारी रोजी क्रीडा, मनोरंजन, आरोग्य आणि संस्कृती असे विषयांवर दिग्गज बोलतील. 27 फेब्रुवारीला सत्तासंमेलन भरेल. त्याची थिम ‘नव्या भारताची गॅरंटी – 2024 ‘ अशी ठेवण्यात आली आहे

25 फेब्रुवारी रोजी क्रीडा-कला क्षेत्रातील दिग्गजांची मांदियाळी

‘व्हॉट इंडिया थिंक्स टु़डे ग्लोबल समिट 2024’ चे उद्घाटन 25 फेब्रुवारीला केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या भाषणाने होईल. त्यानंतर क्रीडा आणि कला क्षेत्रातील प्रमुख मान्यवर आपले विचार मांडतील. यात प्रमुख आकर्षण भारतीय एथलीट हरमिलन बॅंस, क्रिकेटर सुर्य कुमार यादव, अमीर हुसैन, लतिका खनेजा, पीर नौबर्ट, सुभ्रांशु सिंह, पुल्लेला गोपीचंद तसेच कला क्षेत्रातील अभिनेत्री रवीना टंडन, विक्रांत मॅस्सी, साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन उपस्थित असतील. नीती आयोगाचे माजी सीईओ अमिताभ कांत ब्रॅंड इंडीया विषयावर आपले मत मांडतील. परिषदेत संगीत आणि महिला स्टार ज्युलिया फर, खुशबु सुंदर आणि Mirjam eisele आपले विचार मांडतील.

26 फेब्रुवारीचे मुख्य आकर्षण पीएम मोदी

परिषदेच्या दुसऱ्या दिवसाचे मुख्य आकर्षण पीएम मोदी असतील. परिषदेत ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी एबॉट देखील सहभागी होतील. त्याशिवाय मालदीवचे माजी सुरक्षामंत्री मारिया अहमद दीदी, Velina tchakarova, संयुक्त राष्ट्र संघटनेचे भारताचे माजी स्थायी प्रतिनिधी सैयद अकबरुद्दीन, ‘युद्ध् युगाचा नव्हे तर विश्व शांतीचा प्रेरक भारत’ या विषयावर भारतातील इस्रायलचे राजदूत नाओर गिलोन हे बोलतील, चित्रपट निर्माता जोनाथन ब्रोन्फमॅन, अनुराग मैरल, शैलेश राव ‘कृत्रिम बुद्धीमत्ता : फायदे आणि तोटे’ या विषयावर बोलतील.

अर्थव्यवस्था, स्टार्टअप आणि महीला शक्तीवर चर्चासत्र –

परिषदेच्या दुसऱ्या दिवशी ‘नारी शक्ती विकसित भारत’ या विषयावर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी बोलतील. त्यानंतर ‘स्टार्टअप इंडिया’ या विषयावर उद्योग जगतातील निलेश शाह, जयेन मेहता, सुषमा कौशिक, दीपेंदर गोयल, सह अन्य दिग्गज चर्चा करतीस. अर्थव्यवस्था आणि इन्फ्रा गुंतवणूकीवर अर्थ मंत्री निर्मला सीतारमण आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हे बोलतील. तसेच अभिनेत्री कंगना रनौत हिचे देखील भाषण होईल.

27 तारखेला राजकीय नेत्यांची उपस्थिती –

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे ‘ भारत की शौर्यगाथा’ या विषयावर आपले विचार मांडतील. ‘कोणाची सत्ता’ या विषयावर कॉंग्रेस नेते पवन खेडा आणि भाजपा प्रवक्ता सुधांशु त्रिवेदी आपले विचार मांडतील. योग गुरु बाबा रामदेव ग्लोबल स्वामी तर जम्मू-कश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा कश्मीरची नवीन कहानी या विषयावर बोलतील. यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आसामचे हिमंता विस्वा शर्मा, दिल्लीचे अरविंद केजरीवाल, उत्तराखंडचे पुष्कर सिंह धामी, मध्यप्रदेशचे मोहन यादव, छत्तीसगडचे विष्णु देव सहाय, हरियाणाचे मनोहर लाल खट्टर, पंजाबचे भगवंत मान आदींची उपस्थिती असेल.

अमित शाह,अखिलेश यादव आणि ओवेसी यांचे विचार –

परिषदेच्या तिसऱ्या दिवशी ‘नेपथ्याचे नायक’ या चर्चासत्रात गृहमंत्री अमित शाह आपले विचार मांडतील. कांग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, एआयएमआयएमचे प्रमुख अससुद्दीन ओवेसी विविध चर्चासत्रात भाग घेत विचार मांडतील. केद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि अभिनेता आमीर खान आदी सहभागी होतील.

ग्लोबल साऊथचा आवाज….

भारताची अर्थव्यवस्था कोरोनाकाळातही स्थिर राहात यातून बाहेर पडली. आता देशाची अर्थव्यवस्था जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. या दशकाच्या अखेर भारताची अर्थ जगातीस तिसऱ्या क्रमांकावर नेण्याचे ध्यैय्य आहे. भारताचा विकासाची स्पर्धा आता चीनशी होणार आहे. हे दोन्ही देश ग्लोबल साऊथचे नेतृत्व करण्यासाठी एकमेकांचे प्रतिस्पर्धी बनले आहे. ग्लोबल साऊथ देशांचे नेतृत्व करण्याच्या भारताची क्षमता असल्याचे सर्वात ताजे उदाहरण म्हणजे भारताने यशस्वीपणे आयोजित केलेली G20 शिखर परिषद होय. भारताच्या अध्यक्षतेखाली आफ्रीकी संघाना G20 मध्ये आपण सदस्यत्वाचा दर्जा दिला. पाश्चिमात्य देशांच्या निर्बंधानंतरही आपण रशियाकडून तेल आयात करु शकलो. जागतिक मंदीतून सहीसलामत विकासाकडे झेप घेऊ शकलो यावर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आपले विचार मांडतील.