
जेव्हा तुम्ही फिरण्यासाठी निघाला आहात, अशावेळी हॉटेल, एअरपोर्ट किंवा अन्य अनोळखी ठिकाणी तुम्ही तुमचा मोबाईल चार्ज करण्यासाठी चार्जिंग पॉइंटचा वापर करतात. मात्र यामुळे तुमच्यासोबत मोठा धोका होण्याची शक्यता असते. अशा अनोळखी ठिकाणी तुम्ही जेव्हा मोबाईल चार्जिंग करण्यासाठी चार्जिंग पॉइंटचा उपोयग करता तेव्हा त्याच्या माध्यमातून तुमच्या मोबाईलमध्ये मालवेअर इस्टॉल केला जाऊ शकतो, किंवा तुमच्या मोबाईलमध्ये असलेली गोपनिय माहिती देखील चोरीला जाऊ शकते. यामुळे तुमची प्रायव्हसी धोक्यात येऊ शकते, तुमचं मोठं आर्थिक नुकसान होण्याची देखील शक्यता असते. हा धोका टाळण्यासाठी तुम्ही USB कंडोमचा वापर करू शकता. USB कंडोम ही एक प्रकारची विशिष्ट केबल असते, ज्याचा उपयोग हा डेटा ट्रान्सफरसाठी केला जात नाही तर फक्त चार्जिंगसाठी केला जातो.
USB कंडोम हे फक्त एक विशिष्ट प्रकारचं केबल असतं, जे तुमचा मोबाईल मालवेअर आणि डाटा चोरीच्या घटनांपासून सुरक्षित ठेवते.चला तर मग जाणून घेऊयात युएसबी कंडोम नेमकं काम कसं करतं आणि त्याचा उपयोग कसा करायचा? याबाबत. जर तुम्ही तुमचा मोबाईल घरापासून दूर एखाद्या अनोळखी ठिकाणी चार्ज करत असाल तर तुमच्या मोबाईलमध्ये मालवेअर घुसण्याची भीती देखील असते. त्यामुळे अशा स्थितीमध्ये तुम्हाला युएसबी कंडोमचा उपयोग केला पाहिजे, युएसबी कंडोम म्हणजे एक विशिष्ट प्रकारचे डोंगल किंवा त्याला आपण केबल देखील म्हणू शकतो तशी असते. तुम्ही जेव्हा युएसबी कंडोम तुमच्या मोबाईलला लावता तेव्हा हे केबल तुमच्या मोबाईलमधला कुठल्याही प्रकारचा डेटा USB कनेक्शनवर ट्रान्सफर करण्यास प्रतिबंध करते, त्यामुळे तुमचा मोबाईल सेफ राहतो.
सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर तुम्ही जेव्हा USB कंडोमचा वापर करता तेव्हा तुमच्या मोबाईलमधून इतर मोबाईल किंवा कोणत्याही सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअरमध्ये डाटा ट्रान्सफर होत नाही. तसेच कुठलाही मालवेअर मोबाईलमध्ये प्रवेश देखील करू शकत नाही. USB कंडोम हे तुमचा मोबाईल सुरक्षित ठेवण्याचं काम करतं, विविध प्लॅटफॉर्मवर हे डिव्हाईस विक्रीसाठी उपलब्ध आहेत.