फास्टॅग वार्षिक पास म्हणजे काय? नेमका वापर काय? कोणाला होणार फायदा; 9 प्रश्नांची उत्तरं!
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी फास्टॅगविषयी नवे धोरण जाहीर केले आहे. या धोरणाअंतर्गत आता फास्टॅगचा वार्षिक पास मिळणार आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी (18 जून) फास्टॅगच्या नव्या धोरणाची घोषणा केली आहे. हे नवे धोरण येत्या 15 ऑगस्टपासून लाहू होणार आहे. या धोरणाअंतर्गत फास्टॅग अंतर्गत वार्षिक पास प्रणाली लागू करण्यात आली आहे.
गडकरी यांनी केलेल्या नव्या घोषणेअंतर्गत आता एका वर्षाचा फास्टॅग पास मिळणार आहे. या वार्षिक फास्टॅगची किंमत ही 3000 हजार रुपये असणार आहे. या निर्णयामुळे आता खासगी वाहनांना राष्ट्रीय महागार्गांवर प्रवास करताना त्रास सहन करावा लागणार नाही. दरम्यान, या निर्णयानंतर आता या नव्या धोरणाचा फायदा नेमका कोणाला होणार? एक्स्प्रेस वेवर वाहन चालवताना याचा फायदा होणार की नाही? राज्य महामार्गावरही याचा लाभ मिळणार का? लोकल टोलवर हा पास चालणार का? या सर्व प्रश्नांची उत्तर जाणून घेऊ या…
फास्टॅग वार्षिक पास म्हणजे काय?
फास्टॅग वार्षिक पास हा खासगी कार, जीप, व्हॅन यांच्यासाठी राष्ट्रीय महामार्ग, नॅशनल एक्स्प्रेसवरील टोल नाक्यांवर लागू असेल. या धोरणाअंतर्गत 200 ट्रिप किंवा एक वर्षापर्यंत प्रत्येकवेळी टोल देण्याची गरज नाही.
वर्षिक पास कुठे करेदी करता येईल?
हा वार्षिक पास तुम्हाला राजमार्ग यात्रा मोबाईल अॅप किंवा NHAI च्या संकेतस्थळावर मिळू शकतो. सध्यातरी हा पास अन्य संकेतस्थळांवर मिळणार नाही.
कोणत्या टोल नाक्यांसाठी लागू असेल हा पास ?
हा फास्टॅग पास फक्त नॅशनल हायवे तसेच नॅशनल एक्स्प्रेसवेसाठीच लागू असेल. राज्य महामार्ग किंवा अन्य स्थानिक टोल नाक्यावर हा फास्टॅग पास सामान्य फास्टॅगप्रमाणे काम करेल.
वार्षिक पास कधिपर्यंत वैध असेल?
फास्टॅग पास हा एक वर्ष किंवा 200 ट्रिपपर्यंत वैध असेल.
सर्व गाड्यांसाठी हा पास लागू असेल का?
हा फास्टॅग वार्षिक पास सर्वच गाड्यांसाठी लागू नसेल. फक्त खासगी, बिगर व्यावसायिक कार, जीप यांनाच हा पास लागू असेल.
वार्षिक पासला अन्य गाडीत ट्रान्सफर केला जाऊ शकतो का?
ज्या गाडीवर फास्टॅग लावलेला आहे. त्याच गाडीवर हा वार्षिक फास्टॅग पास लागू असेल.
फास्टॅगला गाडीच्या काचेवर लावणे गरजेचे आहे का?
वार्षिक फास्टॅग पासला गाडीच्या काचेवर लावणे गरजेचे आहे.
एक ट्रिप म्हणजे नेमकं काय?
पॉइंट आधारित टोल नाक्यांवर येण्या-जाण्याला वेगवेगळ्या ट्रिप ग्राह्य धरले जाते. म्हणजेच एकदा एखाद्या रस्त्यावर येणं-जाणं केलं तर त्याला दोन ट्रिप ग्राह्य धरलं जातं. तर एंट्रि-एक्झिट आदारित टोल प्लाझावर एंट्री आणइ एक्झिट मिळून एक ट्रिप असल्याचं ग्राह्य धरलं जातं.
वार्षिक पासबाबत एसएमएस अलर्ट मिळणार का?
वार्षिक पास सक्रिय झाल्यानंतर तुम्हाला नोदंणीकृत मोबाईल नंबरवर एसएमएस द्वार सूचना दिल्या जातील.
