मांसाहारी दूध म्हणजे नेमकं काय? अमेरिकेला भारतात का विकायचं आहे? जाणून घ्या फायदे, तोटे

भारतामध्ये बहुसंख्य लोक हे शाकाहारी आहेत, त्यामुळे भारतात या प्रकराच्या नॉनव्हेज दुधावर प्रश्नचिन्ह निर्माण होणं हे सहाजिक आहे. जाणून घेऊयात मांसाहारी दूध म्हणजे नेमकं काय आहे?

मांसाहारी दूध म्हणजे नेमकं काय? अमेरिकेला भारतात का विकायचं आहे? जाणून घ्या फायदे, तोटे
| Updated on: Jul 17, 2025 | 5:45 PM

अमेरिका आणि भारतामध्ये सुरू असलेली ट्रेड डील सध्या चर्चेचा विषय ठरली आहे, अमेरिकेला भारताच्या डेअरी उद्योगात एन्ट्री करायची आहे, मात्र याला भारताकडून अद्याप हिरवा झेंडा दाखवण्यात आलेला नाहीये, याचं सर्वात मोठं कारण म्हणजे नॉनव्हेज मिल्क मांसाहारी दूध आहे. अनेक मीडिया रोपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, जर अमेरिका आणि भारतामध्ये ही व्यापारी डील झाली तर भारताला 2030 पर्यंत तब्बल 500 अब्ज डॉलरचा फायदा होऊ शकतो. मात्र या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करताना भारतानं अमेरिकेला आधीच सांगितलं आहे, की आम्ही आमच्या नागरिकांच्या आरोग्यविषयक सुरक्षेसंदर्भात कोणतीही तडजोड करणार नाहीत.

भारतामध्ये बहुसंख्य लोक हे शाकाहारी आहेत, त्यामुळे भारतात या प्रकराच्या नॉनव्हेज दुधावर प्रश्नचिन्ह निर्माण होणं हे सहाजिक आहे. जाणून घेऊयात मांसाहारी दूध म्हणजे नेमकं काय आहे? किती देश अशा दुधाचा वापर करतता आणि या दूधाचे फायदे तोटे काय आहेत?

काय आहे नॉनव्हेज दूध

जे दूध देणारे पशु किंवा गायी आहेत, त्यांना चाऱ्याच्या रुपात मांस किंवा रक्त दिलं जातं. त्यांच्यापासून मिळणारं दूध हे मांसाहारी दूध म्हणून ओळखलं जातं. गायींचं वजन वाढवण्यासाठी गायींना चारा म्हणून मासं आणि रक्त दिलं जातं. यामध्ये चिकन, माशे, मांजर आणि कुत्र्यासारख्या प्राण्यांच्या मासांचा समावेश असतो. बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार या जनावरांना मारून विशिष्ट पद्धतीनं त्यांच्या मांसावर प्रक्रिया करून ते मांस दूध देणाऱ्या जनावरांना खायला देतात. या दुधामध्ये प्रोटीनंच प्रमाण जास्त असल्यामुळे ज्या देशांतील लोक डायटवर जास्त फोकस करतात त्या देशांमध्ये या दुधाची सर्वाधिक विक्री होते.

या दुधाचे काही फायदे देखील आहेत आणि काही तोटे देखील आहेत, या दुधात मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आणि प्रोटीनचा साठा असतो त्यामुळे या दुधामुळे हाडं मजबूत होतात, हृदय विकाराचा धोका कमी होतो. मात्र या दुधामुळे त्वचेला नुकसान होण्याची देखील शक्यता असते. हे दूध पचण्यास देखील अतिशय जड असतं, त्यामुळे त्रास होऊ शकतो.