
देशाची राजधानी दिल्लीत नुकत्याच विधानसभा निवडणूका पार पडल्या आहेत. या निवडणूकात आम आदमी पार्टीचा सफाया झाला असून २७ वर्षांनंतर भाजपा सत्तेत आली आहे. मतदानाचा पवित्र हक्क बजावताना नेहमी मतदात्यांच्या बोटांच्या नखाला एक विशिष्ट प्रकारचा शाई लावली जाते. या शाईचा नेमका काय इतिहास आहे. आधी बोटांना लावली जाणारी शाई नंतर नखांना का लावली जाऊ लागली या शाई मागचा इतिहास काय आहे ? जगातील कोण-कोणत्या देशात या शाईला मागणी आहे ते पाहूयात…. ब्रिटीशांकडून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रथम १९५१-५२ मध्ये पहिल्यांदा सार्वजनिक निवडणूका घेण्यात आल्या. त्यावेळी अनेकांना भलत्याच मतदार संघात मतदान केले. अनेक लोकांनी एकापेक्षा जास्त वेळा मतदान केले.निवडणूक आयोगाकडे या संदर्भात तक्रारी आल्या. त्यानंतर यावर उपाय शोधण्यात आला. अनेक पर्यायांवर विचार केल्यानंतर मतदात्यांच्या बोटांवर एक निशाणी बनविण्याचा पर्याय पुढे आला, ज्यामुळे एखाद्याने मतदान केले आहे की नाही हे समजायला सोपे जावे. ...