राम मंदिर ट्रस्टच्या सीईओना किती असणार वेतन, किती वर्षांचा कार्यकाळ, A टू Z माहिती आली…
श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाने श्री राम जन्मभूमी मंदिराच्या सीईओ पदासाठी अर्ज मागवले आहेत. रामजन्म भूमी श्रीराम मंदिरातील दानात हेराफेरी झाल्यानंतर आता सरकारने राममंदिर न्यासाची निर्मिती केली असून त्याचा कारभार आता सीईओ पाहाणार आहेत.

श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाने श्री राम जन्मभूमी मंदिराच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदासाठी जनतेतून अर्ज मागवत आहेत. अर्जाची अंतिम तारीख १८ जुलै २०२६ रोजी निर्धारित केलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी १८ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंत सीईओ अर्थात श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ( सीईओ ) पदासाठी अर्ज करु शकता.
श्रीराम मंदिर ट्रस्टने श्रीराम मंदिर ट्रस्टने श्री राम जन्मभूमी मंदिराच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ)पदासाठी अर्ज मागवण्याची अधिसूचना जारी केली आहे. ट्रस्टच्या वतीने जारी केलेल्या जाहिरातीनुसार सीईओच्या सेवा कालावधीचा करार तीन वर्षांचा असणार आहे. मात्र, चांगली कामगिरी केल्यास करार वाढवून देण्याची शक्या आहे. या पदासाठी अयोध्येत नोकरी करावी लागणार आहे.
किती वेतन मिळणार ?
श्रीराम मंदिर ट्रस्टने श्री राम जन्मभूमी मंदिराच्या मुख्य कार्यकाऱ्याच्या नियुक्तीसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. सीईओ पदाचे वेतना संदर्भात बोलायचे झाले तर सीईओना वेतन किती असणार आहे याची माहिती देण्यात आलेली नाही. ट्रस्टने सांगितले की सीईओचे वेतन आणि सुविधा परस्पर मुलाखतीत निश्चित करण्यात येणार आहेत. ट्रस्टनुसार सीईओ बनण्याची किमान पात्रता स्नातक ( पदवी ) असणार आहे. तसेच वयोमर्यादा ५० ते ७० दरम्यान ठेवण्यात आली आहे.
सीईओसाठी कोण करु शकतो अर्ज
सीईओ बनण्यासाठी विशाल सार्वजनिक संघटना, संस्था, विभाग, कंपनीच्या व्यवस्थापनात जबाबदारीने काम करण्याचा किमान २० वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. हा अनुभव बहु-आयामी ( सामान्य प्रशासन ) वित्त, लेखा, पर्सनल, जनसंपर्क, आयटी, सुरक्षा आणि विधी आदी ) समन्वय आणि मार्गदर्शनाचा अनुभव असायला हवा आहे. मुख्य प्रशासकीय अधिकारी अथवा मंदिर, हिंदू धार्मिक संस्थाचे व्यवस्थापनाच्या अनुभवाला प्राधान्य देण्यात येणार आहे. या प्रकारचा अनुभव, कौशल्य आणि क्षमता असलेले सेवानिवृत्त अधिकारी या सीईओ पदासाठी अर्ज करु शकतात.
येथे पोस्ट पहा –
श्री राम जन्मभूमि तीर्थक्षेत्र (न्यास) श्री राम जन्मभूमि मंदिर के मुख्य कार्यकारी अधिकारी पद के लिए योग्य जनों से आवेदन आमंत्रित करता है
आवेदन की अंतिम तिथि: शनिवार १८ जुलाई २०२६; सायं ४ बजे
Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra (Trust) invites applications from eligible… pic.twitter.com/PHa0MbT5kY
— Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra (@ShriRamTeerth) July 13, 2026
अर्ज कुठे करावा ?
अर्जदाराने सक्रीय हिंदू असणे अनिर्वाय आहे.तसेच श्रीरामभक्त वैष्णव असणे बंधनकारक आहे. तसेच हिंदी आणि इंग्रजीचे चांगले ज्ञान असणे गरजेचे आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख आणि वेळ १८ जुलै २०२६, सायं. ४ वाजेपर्यंत असणार आहे. उमेदवाराने searchcommittee.srjbt@gmail.com वर इमेल करावा असे सांगण्यात आले आहे.