AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलीच्या लग्नात नाचताना वडिलांना आला हार्ट अटॅक, खाली कोसळताच झाला मृत्यू  

मुलीच्या लग्नात नाचताना वडिलांना हार्ट अटॅक आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जाणून घ्या कुठे आणि कशी घडली घटना.

मुलीच्या लग्नात नाचताना वडिलांना आला हार्ट अटॅक, खाली कोसळताच झाला मृत्यू  
लग्नImage Credit source: Social Media
| Updated on: Dec 13, 2022 | 9:14 AM
Share

अल्मोडा, उत्तराखंडमधील अल्मोडा येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीच्या लग्नात नाचत असताना वडिलांना हार्ट अटॅक (Heart Attack in Marriage) आल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. लग्नाचा आनंद काही क्षणातच  दुःखात बदलला. दुसरीकडे वधूच्या नातेवाईकांनी हल्दवणी येथे जाऊन शोकाकूल वातावरणात विवाह पार पाडला. यावेळी वधूच्या मामाकडून कन्यादान करण्यात आले. या हृदय हेलावणाऱ्या घटनेमुळे मुलीच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

पोलिसांनी घटनास्थळाचा केला पंचनामा

मिळालेल्या माहितीनुसार, हल्दवानी येथील मीज हॉलमध्ये रविवारी लग्नसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. विवाह सोहळा पार पाडण्यासाठी वधूपक्षातील लोकांना हल्दवणी येथे जावे लागले. याआधी मुलीच्या मेहेंदी, हळदीसह सर्व विधी तिच्या अल्मोडा येथील घरी केले जात होते. विधी दरम्यान लोक रात्री उशिरा नाचत होते. दरम्यान, वधूचे वडीलही नाचण्याच्या कार्यक्रमात सहभागी झाले.

हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

दरम्यान, वधूचे वडील नाचत असताना  अचानक कोसळले. त्यांना तात्काळ स्थानिक बेस हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे मुलीकडच्या मंडळींमध्ये शोककळा पसरली. मुलीचे हात पिवळे होण्याच्या काही तासांआधीच वडिलांचा मृत्यू झाला.

वधूच्या वडिलांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासासाठी पाठवला आहे.

वधूच्या मामाने केले कन्यादान

दुसरीकडे, रविवारी मुलीच्या लग्नाची तयारी पूर्ण झाली होती. विवाह सोहळ्यासाठी वधूच्या मामासह इतर काही नातेवाईक हल्दवणी येथे रवाना झाले. हल्द्वानी येथे रात्री उशिरा वधूचा विवाह साधेपणाने पार पडला. यावेळी वधूच्या मामाने वधूचे कन्यादानही केले. लग्नानंतर वधूचे कुटुंब अल्मोडा येथे परतणार आहे. मुलीच्या वडिलांवर अंत्यसंस्कार केले जातील.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.