Abhijeet Dipke : दीपके खूप पुढचा विचार करतो, समोर आणला नवीन लीडर, सीजेपीच्या आंदोलनाचं नेतृत्व करणारा अजिंक्य शिंदे कोण?
Abhijeet Dipke : "जर मला, सौरव दास आणि आशुतोष रांकाला ताब्यात घेतलं तर राष्ट्रीय संघटनेचे प्रभारी अजिंक्य शिंदे जंतर-मंतरवरील आंदोलनाचं नेतृत्व करतील" असं त्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.

कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजीत दीपकेने सरकारला चकवलं आहे. अभिजीत दीपके आज जंतर-मंतरवर आंदोलनात सहभागी होण्यासाठी विमानाने मुंबईहून दिल्लीला गेले. पण दिल्ली विमानतळावर त्यांनी पाऊल ठेवण्याआधीच विमानातच त्यांना अटक करण्यात आली. अभिजीत दीपके यांच्या सीजेपीचे तीन प्रमुख चेहरे आहेत. ते स्वत:, आशुतोष रांका आणि सौरव दास. आज दिल्ली पोलिसांनी तिघांना एकाचवेळी ताब्यात घेतलं. त्यामुळे आता सीजेपीचं आंदोलन फ्लॉप होणार असं वाटलं. पण अभिजीत दीपकेंच्या सीजेपीने आधीच स्ट्रॅटची बनवून ठेवली होती. त्यांनी रणनिती बदलली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आता अजिंक्य शिंदे आंदोलनाचं नेतृत्व करेल असं अभिजीत दीपकेने म्हटलं आहे. अटक होईल ही शक्यता असल्याने दीपके यांनी आधीच व्हिडिओ बनवून ठेवला होता. त्यांना अरेस्ट झाल्यानंतर सीजेपीने दीपकेंचा हा व्हिडिओ शेअर केला.
“जर मला, सौरव दास आणि आशुतोष रांकाला ताब्यात घेतलं तर राष्ट्रीय संघटनेचे प्रभारी अजिंक्य शिंदे जंतर-मंतरवरील आंदोलनाचं नेतृत्व करतील” असं त्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. “हा व्हिडिओ तुम्ही पाहताय याचा अर्थ असा आहे की, आशुतोष, मी आणि सौरव आम्हाला तिघांना अटक झालीय. आमच्यानंतर अजिंक्य शिंदे या मोहिमेचं नेतृत्व करेल. अजिंक्य शिंदेंच्या सूचनांच तुम्ही पालन करा. आशुतोष, सौरव आणि माझ्यानंतर अजिंक्य सीजेपी पुढे घेऊन जाईल” असं अभिजीत दीपकेने त्या व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये म्हटलं आहे.
कोण आहे अजिंक्य शिंदे?
अजिंक्य शिंदे राष्ट्रीय संघटनेचा प्रभारी आहे. या महिन्याच्या सुरुवातीला शिवाजी पार्क येथे आंदोलन झालं. त्याचं आयोजन अजिंक्य शिंदे यांनी केलं होतं. अजिंक्य शिंदे सुद्धा सीजेपीचा मुख्य चेहरा आहे. शिवाजी पार्कच्या आंदोलनासाठी जो गु्न्हा दाखल झाला, त्यात अजिंक्य शिंदे सुद्धा एक आरोपी आहे. इन्स्टाग्रामवर अजिंक्य शिंदेंचे 23.2k फॉलोअर्स आहेत. ‘स्कूल ठीक करो’ कॅम्पेनचा तो सुद्धा एक भाग आहे. दिल्लीत सुरु असलेल्या सीजेपीच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. आकाशवाणी भवन जवळ दगडफेक झाल्याची माहिती आहे.