AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोण आहेत साराह सनी ? देशातील पहिल्या मुक-बधीर महिला वकीलाने रचला इतिहास

देशातील पहिली मुक-बधीर वकील म्हणून साराह सनी यांनी नवा इतिहास रचला आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयात सांकेतिक भाषेत युक्तीवाद करुन नवा पायंडा पाडला आहे.

कोण आहेत साराह सनी ? देशातील पहिल्या मुक-बधीर महिला वकीलाने रचला इतिहास
Sarah SunnyImage Credit source: socialmedia
| Updated on: Oct 02, 2023 | 7:45 PM
Share

नवी दिल्ली | 2 ऑक्टोबर 2023 : कौन कहता है कि आसमां में छेद नहीं हो सकता जरा एक पत्थर तो तबियत से उछालो यारो असे  म्हटले जाते. म्हणजे जगात अशक्य असे काहीच नाही केवळ प्रयत्नांची शिकस्त हवी..गेल्या महिन्यात 22 सप्टेंबर रोजी सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टीसच्या खंडपीठासमोर पहिल्यांदा एक आगळी सुनावणी झाली. या सुनावणीत इतिहासात प्रथमच एका मूक-बधीर महिला वकीलाने सांकेतिक भाषेत आपल्या अशिलाची बाजू मांडली. या मुक-बधीर वकीलाच्या मदतीसाठी दुभाषक म्हणून सौरव रॉयचौधरी यांनी काम पाहीले. व्हर्च्युअल झालेल्या या सुनावणीत आपल्या प्रकरणाचा युक्तीवाद करून वकील साराह सनी या अनेकांसाठी मार्गदर्शक दीपस्तंभ ठरल्या आहेत.

सुरुवातीला ऑनलाईन कोर्टचे मॉडरेटरने दुभाषाला व्हिडीओ ऑन करण्याची परवानगी दिली नाही. परंतू मुख्य न्यायाधीशांनी परवानगी दिल्यानंतर त्यालाही व्हर्च्युअल कोर्टात विंडोत येण्याची परवानगी मिळाली. साराह सनी यांच्या साठी ही सारी व्यवस्था एडव्होकेट ऑन रेकॉर्ड संचिता एन यांनी केली होती. दिव्यांगाना संधी मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी.वाय.चंद्रचुड यांचा हा प्रयत्न मैलाचा दगड मानला जात आहे.

कौन आहेत साराह सनी ?

साराह लहानपणापासून ऐकू आणि बोलू शकत नाहीत. परंतू त्यांच्या पालकांनी दिलेल्या पाठींब्याने साराह यांनी हे यश मिळविले आहे. साराह यांनी बंगळुरुच्या सेंट स्टीफन कॉलेज ऑफ लॉमधून एलएलबीची पदवी मिळविली आहे. ती तिचे वरिष्ठ संचिता याच्या मार्गदर्शनाखाली सुप्रीम कोर्टात प्रॅक्टीस करीत आहे.

बीबीसीच्या बातमीनूसार लॉ पास केल्यानंतर साराह यांनी कर्नाटक येथील जिल्हा कोर्टातून आपल्या करीयरला सुरुवात केली. परंतू तेव्हा जजनी त्यांनी दुभाषक उपलब्ध करू दिला नाही. तेव्हा त्यांनी असा आक्षेप घेतला की दुभाषकाला कायद्याचे ज्ञान नसते. त्यामुळे ते युक्तीवाद करु शकत नाहीत. तेव्हा साराह सनी लिहून आपला युक्तीवाद करीत असे.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना