AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गळ्यात रुद्राक्षमाळ, भगवे वस्त्र, संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत भारतावर आरोप, कोण आहे नित्यानंदाची शिष्या विजयप्रिया?

भारतातून फरार झालेल्या स्वामी नित्यानंदाने स्थापन केलाय काल्पनिक देश, भारताकडून त्याचा छळ होत असल्याची तक्रार

गळ्यात रुद्राक्षमाळ, भगवे वस्त्र, संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत भारतावर आरोप, कोण आहे नित्यानंदाची शिष्या विजयप्रिया?
Image Credit source: social media
| Updated on: Mar 01, 2023 | 10:17 AM
Share

नवी दिल्ली | भारतात बलात्काराचा (Rape) आरोप असलेला आणि सध्या फरार असलेला स्वामी नित्यानंद (Nityanand) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी चर्चा आहे त्याच्या शिष्येची. स्वामी नित्यानंद याने कैलासा नामक एक काल्पनिक देश तयार केल्याचा दावा केला आहे. या देशाची राजदूत म्हणून नित्यानंद याची शिष्या विजयप्रिया हिने नुकताच संयुक्त राष्ट्र परिषदेत एंट्री घेतली. जिनिव्हा येथे झालेल्या या बैठकीत विजयप्रियाने स्वामी नित्यानंदावर भारत अन्याय करत असल्याची तक्रार केली आहे. या बैठकीला कैलासा देशाचे इतर प्रतिनिधीदेखील उपस्थित होते. मात्र वेशभूषेमुळे विजयप्रिया अधिक चर्चेत आली आहे.

 रुद्राक्ष माळ, भगवे वस्त्र

विजयप्रियाचा एक व्हिडिओ स्वामी नित्यानंदाने ट्विट केलाय. यात तिने भारतीय साध्वींसारखा वेश परिधान केलाय. भगवे वस्त्र, दाट केस अर्थात जटांची वेणी, कपाळावर उभं गंध, गळ्यात रुद्राक्षांची माळ अशा वेशभूषेत विजयप्रियाने संयुक्त राष्ट्राच्या परिषदेत प्रवेश केला. तेव्हा ही नेमक्या कोणत्या देशाची प्रतिनिधी आहे, यावरून चर्चा झाली. नंतर नित्यानंदांनी ट्विटरवरून हा व्हिडिओ टाकल्यानंतर सगळा प्रकार उघडकीस आला.

Kailasa

नित्यानंदाने ट्विटरवर शेअर केलेले फोटो

कैलासा देश नेमका काय आहे?

स्वामी नित्यानंदाने कैलासा नावाचा देश स्थापन केल्याचा दावा केला आहे. यासाठीची एक वेबसाइटदेखील त्याने तयार केली आहे. इक्वेडोरच्या किनारपट्टीवर हा देश असल्याचा दावा करण्यात आलाय. या देशाचा स्वतःचा पासपोर्ट, ध्वज आणि कैलासा रिझर्व्ह बँकदेखील असल्याचे म्हटले जाते. पृथ्वीवरील सर्वात मोठं हिंदू राष्ट्र अशी ओळख या देशाची सांगितली जाते. ज्यांना ज्यांना स्वतःच्या देशात हिंदू धर्माचं पालन करता येत नाही, अशा वंचित हिंदुंसाठी हा देश असल्याचं वेबसाइटवर म्हटलं गेलंय. याच देशाची कायमस्वरुपी राजदूत म्हणून विजयप्रिया संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत पोहोचली. तिच्यासह अन्य प्रतिनिधीही उपस्थित होते. स्थानिक कायद्यांमुळे भारतातील शेतकऱ्यांवरही अन्याय होत असल्याची तक्रार कैलासाच्या इतर प्रतिनिधींनी या बैठकीत केली.

नित्यानंदावर आरोप काय?

गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील मणिनगरमध्ये नित्यानंदाचा आश्रम आ हे. या आश्रमातच मुलींना ओलीस ठेवण्याचे प्रकरण समोर आले होते. २०१९ मध्ये बंगळूरू येथील एका जोडप्याने नित्यानंद आणि आश्रमातील दोन संचालकांविरुद्ध मुलांचे अपहरण आणि त्यांना ओलीस ठेवण्याची तक्रार केली होती. या दाम्पत्याने त्यांची चार मुले आणि चार मुलींना बंगळुरू येथील आश्रमात सोडले होते, मात्र मुलींना अहमदाबाद येथील आश्रमात नेण्यात आल्याचं आणि त्यानंतर त्यांना भेटू दिलं जात नसल्याची तक्रार केली होती. पोलीस तपासानंतर दोन मुली मिळाल्या, मात्र उर्वरीत दोन मुली अजूनही नित्यानंदाच्या ताब्यात आहेत. नित्यानंद मात्र २०१९ पासून भारतातून फरार झाला आहे. संयुक्त राष्ट्रातील कैलासा देशाच्या प्रतिनिधींमुळे स्वामी नित्यानंद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.