AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशातील संसदेमध्ये निवडून गेलेल्या खासदारांची संख्या जरी 543 असली तरी या संख्येत 420 नंबरची सीट मात्र असते गायब, नेमके काय आहे यामागील गूढ?

14 व्या लोकसभेच्या दरम्यान खासदारांना सीट नंबर अलॉट केले जात होते. त्यावेळी एका सदस्याला 420 नंबरची सीट वाट्याला आली, ज्यामुळे त्या सदस्याने वाट्याला आलेली ही सीट म्हणजे आपला अपमान असल्याचे सांगत अध्यक्षांना या क्रमांकाची सीटच रद्द करण्याची विनंती केली होती.

देशातील संसदेमध्ये निवडून गेलेल्या खासदारांची संख्या जरी 543 असली तरी या संख्येत 420 नंबरची सीट मात्र असते गायब, नेमके काय आहे यामागील गूढ?
parliament
| Edited By: | Updated on: Jan 28, 2022 | 6:24 PM
Share

नवी दिल्लीः आपल्या देशात दिशेला घेऊन नंबरांपर्यंत शुभ-अशुभ (Auspicious-Inauspicious) असे मानणारे अनेक लोक आहेत. नंबरांना आपल्या देशात खूप महत्त्व दिले जाते. कोणत्याही प्रकारचे शुभ काम करण्यासाठी आधी तारीख पाहिली जाते. यासाठी नंबर यांची गणना केली जाते, याशिवाय प्रत्येकाचा कोणता ना कोणता लकी नंबर (Lucky Number) हा असतोच. प्रत्येकाचे आपापले तर्कवितर्क असतात. याशिवाय काही लोक असे सुद्धा असतात, जे या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाहीत. असाच एक नंबर आहे 420. या नंबरला आपल्या देशात योग्य समजले जात नाही आणि याचा परिणाम देशाच्या संसदेत (Parliament) सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला.

आता प्रश्न असा आहे की संसदेच्या सदनात लोकसभेत एकूण निवडलेले एकूण 543 सदस्य तेथे पोहोचत असतात, प्रत्येकासाठी तेथे सीट वाटप केली जाते. तर मग अशातच 420 नंबरची जी सीट असते त्या सीटवर नेमका कोणता सदस्य बसतो?

काय आहे 420 च्या मागील गूढ?

देशाच्या संसदेत 420 नंबरच्या सीटला जागा देण्यात आलेली नाही. चौदाव्या लोकसभेनंतरच कोणत्याही खासदाराला हा नंबर दिला जात नाही. खरंतर भारतीय दंड संहिता कलम 420 अंतर्गत फसवणूक अशा प्रकारचा गुन्हा दाखल केला जातो. यासाठी आपल्या देशात हा नंबर धोकेबाजीचे प्रतीक समजला जातो. अनेकदा बोलतानासुद्धा लोक 420 नंबरचा उल्लेख करत असल्यास यामागे फसवणूक केल्याची भावना असते.

तर काय लोकसभेत आहे 420 नंबर सीट?

तर या मागील गूढ असे आहे की,जेव्हा 14व्या लोकसभेदरम्यान देशातील वेग वेगळ्या भागातून निवडून आलेल्या खासदारांना संसदेत सीट नंबरचे वाटप चालू होते. याचदरम्यान एका सदस्यास 420 नंबरची सीट वाट्याला आली. यानंतर त्या सदस्याने हा आपला अपमान असल्याचे समजत ती रद्द करण्याची विनंती अध्यक्षांकडे केली. सदस्यांनी केलेल्या या विनंतीनंतर लोकसभेतील 420 नंबरची हि सीट रद्द करण्यात आली आणि त्याच्या जागी सीट नंबर 419-A अशा नावाची नवीन सीट तयार करण्यात आली.

कोण ठरवतं खासदारांच्या बसण्याची जागा?

लोकसभेत कोणता सदस्य कोठे बसणार या गोष्टीचा निर्णय घेण्याचा अधिकार लोकसभा स्पीकर म्हणजेच अध्यक्ष यांच्याकडे असतो. लोकसभेच्या या एकूण जागा 6 ब्लॉकमध्ये विभागीत करण्यात आल्या आहेत, तर या प्रत्येक ब्लॉकमध्ये अकरा लाईन आहेत.

कशी मिळाली होती 419-A सीट?

15व्या लोकसभेदरम्यान सीटचे वाटप करत असताना 420 नंबरची सीट आसाम युनायटेड डेमोक्रॅटीक फ्रंट (AIUDF) खासदार बदरुद्दीन अजमल यांना 420 नंबर ऐवजी 419-A या नंबरची सीट देण्यात आली. भारतीय संविधानात या बद्दलची तरतूद सुद्धा करण्यात आली आहे की संसदेची अधिकतर सदस्य संख्या ही 552 असेल.

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ