अण्णा हजारे अदृश्य झाले, लोकांच्या मनात शंका आहे; संजय राऊत असं का म्हणाले?

| Updated on: Dec 24, 2022 | 11:40 AM

राज्यात एवढा मोठा भूखंड घोटाळा झाला. अण्णा हजारे हे या विषयावर गप्प का आहेत? सरकारने बोहणीचा भ्रष्टाचार केला. त्यावर कोणी काहीच बोलत नाही?

अण्णा हजारे अदृश्य झाले, लोकांच्या मनात शंका आहे; संजय राऊत असं का म्हणाले?
अण्णा हजारे अदृश्य झाले, लोकांच्या मनात शंका आहे; संजय राऊत असं का म्हणाले?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भूखंड घोटाळा उघड झाल्यानंतर ठाकरे गटाने त्यांच्यावर हल्लाबोल सुरू केला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तर शिंदे यांच्या घोटाळ्याची कागदपत्रे केंद्रसरकारला दिली आहेत. तसेच केंद्रीय तपास यंत्रणांनाही काही कागदपत्रे दिली आहेत. मात्र, शिंदे यांच्या या घोटाळ्यावरून राऊत यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनाच टार्गेट केलं आहे. अण्णा हजारे कुठे अदृश्य झाले आहेत. ते राज्यातील घोटाळ्यांवर का बोलत नाहीत? असा सवाल संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना केला आहे.

राज्यात एवढा मोठा भूखंड घोटाळा झाला. अण्णा हजारे हे या विषयावर गप्प का आहेत? सरकारने बोहणीचा भ्रष्टाचार केला. त्यावर कोणी काहीच बोलत नाही? असा सवाल करतानाच इतके दिवस अण्णा हजारेंनी ज्या भ्रष्टाचाराविरोधात रणशिंग फुंकले होते. त्यानंतर ते अदृश्य झाले, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

हे सुद्धा वाचा

राज्यात एक सरकार आलं. ते भ्रष्ट मार्गाने आलं. त्या भ्रष्ट सरकारवर अण्णांनी भूमिका घेऊन जाब विचारल्याचं दिसत नाही. त्यामुळे लोकांच्या मनात शंका आहे. देशभरात केंद्र सरकार महाराष्ट्र सरकार आणि अनेक राज्यातील सरकार भ्रष्टाचार करून सत्ता टिकवत आहे. आमदार विकत घेत आहेत. खासदार विकत घेत आहे, त्यावर कुणीच कसं बोलत नाही? असा सवालही राऊत यांनी केला.

अण्णा हजारेंनी लोकायुक्त आणण्यासाठी आवाज उठवला होता. त्यांच्याकडून लोकांच्या अपेक्षा होत्या. लोकायुक्तांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची गुप्तपणे चौकशी होईल. गुप्त का? उघड का नाही? होऊन जाऊ द्या दूध का दूध पानी का पानी… लोकायुक्तांबाबतचं बिल आल्यावर काय करायचं ते पाहू, असंही ते म्हणाले.

रामसेतूचं अस्तित्व नसल्याचं केंद्र सरकारने म्हटलं आहे. त्यावरूनही त्यांनी केंद्रावर टीका केली. रामसेतूचं अस्तित्व नव्हतं तर रामायणातील कथा या दंतकथा होत्या का? असा सवाल करतानाच रामसेतूचं अस्तित्व नष्ट झालं. उद्या रामाच्या अस्तित्वारही प्रश्नचिन्हं उभे करतील, अशी टीका त्यांनी केली.