AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mecca Pact : ..तर एकाचवेळी पाकिस्तान-बांग्लादेश भारतावर करतील हल्ला, मक्का करार भारतासमोरचं नवीन चॅलेंज

सध्या मक्का करार चांगलाच चर्चेमध्ये आला आहे. सात ऑगस्ट रोजी सौदी अरेबिया, पाकिस्तान आणि तुर्कस्थान या तीन देशांनी मक्का येथे एका संयुक्त संरक्षण करारावर स्वाक्षरी केली. या करारानुसार या तीन देशांपैकी एकावर जरी हल्ला झाला तर तो या करारामध्ये सहभागी असलेल्या इतरही देशांवर हल्ला मानला जाणार आहे.

Mecca Pact : ..तर एकाचवेळी पाकिस्तान-बांग्लादेश भारतावर करतील हल्ला, मक्का करार भारतासमोरचं नवीन चॅलेंज
Mecca AgreementImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 28, 2026 | 10:18 PM
Share

सध्या मक्का करार चांगलाच चर्चेमध्ये आला आहे. सात ऑगस्ट रोजी सौदी अरेबिया, पाकिस्तान आणि तुर्कस्थान या तीन देशांनी मक्का येथे एका संयुक्त संरक्षण करारावर स्वाक्षरी केली. या करारानुसार या तीन देशांपैकी एकावर जरी हल्ला झाला तर तो या करारामध्ये सहभागी असलेल्या इतरही देशांवर हल्ला मानला जाणार आहे. या कराराला नाटो देशांमध्ये जो नियम आहे, तोच नियम लागू करण्यात आला आहे. सुरुवातीला जरी हा फक्त काही मुस्लिम देशांमध्ये झालेला एक साधा करार वाटत असला तरी देखील या मक्का करारामुळे भारताची चिंता वाढण्याची शक्यता आहे. सुरुवातीला या करारामध्ये फक्त तीन देश सहभागी झाले आहेत. मात्र लवकरच या कराराची व्याप्ती वाढण्याचे संकेत मिळत आहेत. भारताचा शेजारी देश असलेल्या बांग्लादेशने देखील या करारामध्ये सहभागासाठी उत्सुकता दाखवली आहे. हा भारतासाठी डोकेदुखीचा विषय ठरू शकतो.

सात ऑगस्ट रोजी सौदी अरेबिया, पाकिस्तान आणि तुर्कस्थान या तीन देशांमध्ये हा करार झाला, परंतु आता याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. या करारामध्ये पश्चिमेकडील जवळपास सर्वच मुस्लिम देश सहभागी होऊ शकतात. जसं की, कतार, कुवैत, बहरीन, जॉर्डन, मिस्त्र, या देशांसोबत एक डझन पेक्षा अधिक देश या करारामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानसोबतच बांग्लादेश देखील या करारामध्ये सहभागी होण्याची शक्यता असल्याने भारताची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. कारण यातील अनेक देशांसोबत भारताचे पूर्वीपासून व्यापारी संबंध आहेत.

बांग्लादेशमुळे टेन्शन वाढणार

दरम्यान या मक्का कारारामध्ये बांग्लादेश देखील सहभागी होण्यास उत्सुक आहे, एकीकडे पाकिस्तान आणि दुसरीकडे बांग्लादेश असं हे गणित आहे. बांग्लादेश हा भारताचा महत्त्वाचा ट्रेड पार्टनर आहे, भारताचा बांग्लादेशसोबतचा व्यापार हा 12-14 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांपासून बांग्लादेशमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत राजकारणामुळे व्यापारामध्ये घट झाली आहे, मात्र तरी देखील बांग्लादेश हा भारताचा महत्त्वाचा व्यापारी भागीदार देश आहे. दरम्यान याचा दुसरा अर्थ असाही होऊ शकतो, जर बांग्लादेश या करारामध्ये सहभागी झाला आणि पाकिस्तानसोबत भारताचा तणाव वाढला तर बाग्लादेश आणि पाकिस्तान एकाचवेळी भारतावर हल्ला करू शकतात.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे