AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वंदेभारत स्लीपरच्या मास प्रोडक्शनला होणार आणखी उशीर, डेडलाईन पुढे ढकल्याने चिंता

वंदेभारत स्लीपर ट्रेनचे मास प्रोडक्शन रखडले आहे. आता पुढील वर्षीच तिचा पहिला प्रोटोटाईप रुळांवर येईल असे म्हटले जात आहे. त्यामुळे मुंबईतील उपनगरी मार्गावरील एसी लोकल प्रमाणे वंदेभारत स्लीपरचे प्रोडक्शन देखील संकटात सापडले आहे.

वंदेभारत स्लीपरच्या मास प्रोडक्शनला होणार आणखी उशीर, डेडलाईन पुढे ढकल्याने चिंता
Vande Bharat Sleeper prototype
| Updated on: Aug 28, 2026 | 8:21 PM
Share

वंदेभारत स्लीपरचे तयार करण्याचे काम मराठवाड्यातील लातूरच्या रेल कोच फॅक्टरीत प्रगती पथावर आहे. मात्र, वंदेभारत स्लीपर ट्रेनचे पुढील प्रोडक्शन मात्र अडचणीत सापडले आहे. या वंदेभारत स्लीपर ट्रेनची पुढील आवृत्तीची डेडलाईन पुढे ढकलण्यात आली आहे. आता वंदेभारत स्लीपरची नवीन ट्रेन ३१ मार्च २०२७ रोजी येणार असल्याचे म्हटले जात आहे. याआधीच्या नियोजनानुसार वंदेभारत स्लीपरचे प्रोडक्शन सुरु होऊन जून २०२६ मध्ये वंदेभारत स्लीपर मिळणार होती. त्यानंतर ती डिसेंबर २०२६ मध्ये येईल असे म्हटले जात होते. आता मात्र, थेट पुढच्या वर्षी मार्चमध्ये वंदेभारत स्लीपरचा प्रोटोटाईप रुळांवर येईल असे म्हटले जात आहे.

रेल्वे विकास निगम लिमिटेडचे (RVNL)चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर सलीम अहमद यांनी २३ व्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत ही माहिती दिली आहे.  वंदेभारत स्लीपरचा प्रोटोटाईपचा विकास रेल्वे विकास निगम लिमिटेडचे (RVNL) आणि रशियन रोलिंग स्टॉक मॅन्युफॅक्चरर ट्रान्समॅश होल्डिंग (TMH) यांच्या इंडो-रशियन जॉईंट व्हेन्चर असलेल्या Kinet Railway Solutions Ltd कडून केला जात आहे.

Kinet Railway Solutions Ltd ला प्रत्येकी १६ डब्यांच्या १२० वंदेभारत स्लीपर ट्रेन सेट्सची बांधणी करण्याचे कंत्राट दिले आहे. एकूण १,९२० कोचेसची बांधणी यात केली जाणार आहे. या प्रकल्पाचा खर्च ३५ वर्षांच्या देखभालीसह एकूण १४,४०० कोटींचा आहे. पहिला प्रोटोटाईप यंदा जुन महिन्यात येईल असे आधी जाहीर करण्यात आले होते. मात्र, आता प्रोजेक्टला उशीर झाल्याने यात पहिला वंदेभारत स्लीपर ट्रेनचा सेट थेट पुढच्या वर्षी मार्च २०२७ रोजी प्राप्त होणार आहे.

दुसरी वंदेभारत स्लीपर मुंबई – पुणे – बंगळुरु मार्गावर

पहिली वंदेभारत स्लीपर ट्रेन ही कोलकाता येथील हावडा जंक्शन ते कामाख्या ( गुवाहाटी- आसाम ) अशी धावत आहे. या ट्रेनचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १७ जानेवारी २०२६ रोजी केले होते. १६ डब्यांच्या या वंदेभारत स्लीपरमध्ये एकूण ८२३ प्रवासी बसू शकतात. दुसरी वंदेभारत स्लीपर मुंबई – पुणे – बंगळुरु मार्गावर धावणार असे म्हटले जात आहे. या ट्रेनच्या ट्रायलचा एक विहंगम व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Follow Us
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान