AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेल्वे परिसरात अस्वच्छता केल्यास, आता भरमसाठ दंड, कोर्टाची पायरी देखील चढावी लागणार

Railway Rules Changed: भारतीय रेल्वेने स्वच्छतेच्या नियम कठोर करत अस्वच्छता पसरवण्यासह अनेक कृतींवर दंडाची रक्कम वाढवली आहे. हा दंड न भरल्यास आरोपीला थेट कोर्टात सादर केले जाणार आहे.

रेल्वे परिसरात अस्वच्छता केल्यास, आता भरमसाठ दंड, कोर्टाची पायरी देखील चढावी लागणार
indian railway
| Updated on: Aug 27, 2026 | 8:49 PM
Share

भारतीय रेल्वेने आता स्थानके, ट्रेन आणि रेल्वेच्या परिसरात स्वच्छते संदर्भातील नियम आता आणखी कडक केले आहेत. आता रेल्वे परिसरात अस्वच्छता केल्यास किमान १ हजार रुपये दंडाची शिक्षा होऊ शकते. आधी ही रक्कम ५०० रुपये होती. रेल्वे मंत्रालयाने अलिकडेच जारी केलेल्या परिपत्रकानुसार Indian Railways ( Penalties for Activities Affecting Cleanliness at Railway Premises ) Rules, 2012 कायद्या रेल्वेने सुधारणा केली आहे.नवीन नियम गॅझेटमध्ये प्रकाशित झाले असून ते तातडीने लागू करण्यात आले आहेत.

सुधारित नियमानुसार रेल्वे परिसरात स्वच्छतेशी संबंधित नियमांचे उल्लंघन केल्यास आता १००० रुपयांपर्यंत दंड लावला जाऊ शकतो. जर एखाद्या व्यक्तीने दंड भरण्यास नकार दिला तर त्याला संबंधित अधिकार क्षेत्रातील सक्षम न्यायालयात कोर्टासमोर सादर केले जाऊ शकते. कोर्ट अशा प्रकरणात दोन हजार रुपयांचा दंड सुनावू शकते.

कोणत्या कृत्यावर दंड

रेल्वेच्या स्वच्छता नियमानुसार स्थानक, ट्रेन वा रेल्वेच्या परिसरात अनेक कृत्यांना रोक लावण्यात आली आहे. त्यात खालील बाबींचा समावेश आहे.

निर्धारित स्थानाशिवाय कुठेही कचरा फेकणे किंवा सोडणे

रेल्वे परिसरात जेवण शिजवणे

रेल्वे परिसरात अंघोळ करणे किंवा कपडे धुणे

रेल्वे परिसरात थुंकणे

उघड्यावर लघवी किंवा शौच करणे

रेल्वे परिसरात प्राण्यांना किंवा पक्ष्यांना अन्न देणे

रेल्वे परिसरात वाहन धुणे

रेल्वेच्या हद्दीत कपडे किंवा भांडी धुणे

रेल्वेच्या हद्दीत सामान ठेवणे

रेल्वेच्या हद्दीत पोस्टर लावणे

कारवाईची व्यापकता वाढवली

नवीन नियमात केवळ कचरा करण्यावर कारवाई पुरते मर्यादित नाहीत. तर रेल्वे कोच वा इतर संपत्तीवर परवानगी विना पोस्टर लावणे, लिहिणे वा चित्र बनवणे देखील प्रतिबंधित आहे. रेल्वेच्या संपत्तीला नुकसान पोहचवणे वा त्याला खराब करणे या कृत्याला दंडात्मक कारवाई होऊ शकते.

वेंडर्स आणि हॉकर्सना देखील दणका

रेल्वेच्या परिसरात काम करणाऱ्या अधिकृत वेंडर्स आणि हॉकर्सवर देखील स्वच्छतेचे नियम लागू होणार आहेत. त्यांना कचरा एकत्र करण्यासाठी डस्टबिन वा योग्य व्यवस्था करणे बंधनकारक आहे. तसेच जमलेला कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्याची जबाबदारी देखील त्यांची असणार आहे.

दंड कोण वसुल करणार ?

रेल्वेच्या नियमानुसार काही अधिकाऱ्यांना या तरतूदी अंतर्गत दंड लावणे आणि तो वसुल करण्याचा अधिकार दिलेला आहे. यात स्टेशन मास्तर वा स्टेशन मॅनेजर, वाणिज्यिक विभागाचे तिकीट कलेक्टर आणि ऑपरेटिंग विभागातील समान रँकचे अधिकारी सामील असणार आहेत. याशिवाय रेल्वेच्या प्रशासनाच्या वतीने अधिकृत अन्य अधिकारी देखील नियमांचे उल्लंघन झाल्यास दंड वसुल करु शकतो.

Follow Us
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी नाकारली, तरी राहुल गांधींसह अनेक नेते सहभागी
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी...
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक पुन्हा रस्त्यावर!
आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
Rahul Gandhi : आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...