AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indian Railway : रेल्वेचा मोठा निर्णय, वेंटिग लिस्टची झंझट संपणार, पाहा नेमके काय होणार ?

सणासुदीच्या पार्श्वभूमीव रेल्वेने आता प्रवाशांची प्रतिक्षा यादी करण्यासाठी एक नवीन पद्धत वापरण्याचा निर्णय घेताला आहे.

Indian Railway : रेल्वेचा मोठा निर्णय, वेंटिग लिस्टची झंझट संपणार, पाहा नेमके काय होणार ?
INDIAN RAILWAY
| Updated on: Aug 24, 2026 | 9:18 PM
Share

Train News: सणासुदीच्या काळात रेल्वेच्या गाड्यांना तगडी वेटिंग लिस्ट असल्याने प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळत नाही. त्यामुळे रेल्वेने आता मेल आणि एक्सप्रेस ट्रेनमध्ये प्रवाशांची अडचण समजून जास्त जागा तयार करण्यासाठी पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांची वाढती मागणी पाहून 22 डब्यांच्या ट्रेनमध्ये आणखीन दोन डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ अनेक ट्रेनमध्ये प्रवाशांची बसण्याची व्यवस्था वाढणार आहे.

वाढती वेटिंग कमी करण्याचा प्रयत्न

रेल्वेच्या या निर्णयाचा सर्वात मोठा परिणाम तिकीटांच्या उपलब्धतेवर होण्याची आशा आहे.ज्या प्रमुख ट्रेनमध्ये गर्दीच्या वेळी १०० ते १५० वेटिंग पोहचते. तेथे दोन अतिरिक्त डबे जोडल्याने वेटिंग २० ते २५ पर्यंत कमी होण्याची होण्याची शक्यता आहे. यामुळे वेंटिगमुळे ज्या प्रवाशांचा प्रवास अखेर क्षणापर्यंत अनिश्चित असतो त्यांना तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता वाढेल.

१६० प्रवाशांची क्षमता वाढेल

केवळ दोन अतिरिक्त डबे वाढवल्याने ज्या श्रेणीची क्षमता वाढेल त्याचा थेट लाभ १६० प्रवाशांना मिळेल. याचा फायदा तिकीटांची मागणी अधिक असलेल्या एसी आणि स्लीपर सारख्या श्रेणींना फायदा होईल. एसी थर्डमध्ये सामान्यपणे वेटिंग ६० ते ७० पर्यंत पोहचते. तर स्लीपरमध्ये हे १०० च्या वरती पोहचते. त्यामुळे जर दोन एसी थर्ड कोच जोडले गेले तर या श्रेणीची तिकिटांची प्रतिक्षा यादी जवळपास संपल्याची स्थिती होईल.

एलटीटी – गोरखपुर सुपरफास्टने सुरुवात

रेल्वे बोर्डाने या निर्णयाची सुरुवात पूर्व रेल्वे झोनमध्ये सुर केली आहे. गोरखपूर ते लोकमान्य टिळक टर्मिनस जाणाऱ्या ट्रेन क्रमांक २०१०४ एलटीटी सुपरफास्ट मध्ये दोन अतिरिक्त डबे लावले आहे. ही व्यवस्था सध्या प्रायोगिक चाचणी म्हणून सुरु केली आहे. रेल्वेच्या यांत्रिक विभागाने पुढील तयारी देखील सुरु केली आहे. बोर्डाच्या निर्देशानुसार दोन डबे कायम स्वरुपी जोडण्याची योजना आहे.

प्रत्येक ट्रेनला हे अतिरिक्त डबे जोडणे सध्या शक्य नाही. आधी त्या ट्रेनाला प्राधान्य दिले जाणार आहे ज्यात सामान्य दिवसातही प्रवाशांची संख्या जास्त असते. सणासुदीसह अचानक वाढणाऱ्या प्रवासी संख्ये सोबत संपूर्ण वर्षभर गर्दी जास्त असलेल्या ट्रेनचा समावेश या योजनेत केलेला आहे.

दोन अतिरिक्त डबे जोडण्याआधी रेल्वे बोर्डाने सर्व १७ झोन मधून मेल आणि एक्सप्रेस ट्रेनच्या सध्याच्या डब्यांच्या व्यवस्थेची माहीती मागवली होती. २२ च्या जागी २४ डबे करण्याचा प्रस्तावावर अनेक दिवस चर्चा विनिमय झाला होता. त्यानंतर डबे वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. ही व्यवस्था लागू करण्याआधी पायाभूत सुविधांची वाढ करण्याचाही सल्ला देण्यात आला होता.

या ट्रेनमध्ये वाढली सामान्य श्रेणीची क्षमता

प्रवाशांची वाढती गर्दी पाहून ट्रेन क्रमांक 54481, 54482, 54483, 54484, 54464, 54463, 54342 आणि 54341 मध्ये अतिरिक्त सामान्य श्रेणीचे डबे वाढवले आहेत. प्रवासी सीट वाढल्याने याचा फायदा वेटिंगच्या प्रवाशांना तर होईल शिवाय रेल्वेचे उत्पन्न देखील वाढणार आहे.

Follow Us
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात अवमान याचिका! सुनावणी सुरु