CJP-Congress : दीपके दिल्लीत असताना राहुल गांधी तामिळनाडूला का निघून गेले? काँग्रेस CJP च्या आंदोलनापासून लांब का झाली? यामागे तीन कारण

CJP-Congress : काँग्रेस आणि कॉकरोच जनता पार्टीची एकसमान मागणी आहे. ज्ञानेश कुमार यांना हटवा आणि SIR प्रक्रिया रद्द करा. मात्र, तरीही काँग्रेस सीजेपीच्या आंदोलनापासून का लांब झाली? या मागे तीन कारणं आहेत.

CJP-Congress : दीपके दिल्लीत असताना राहुल गांधी तामिळनाडूला का निघून गेले? काँग्रेस CJP च्या आंदोलनापासून लांब का झाली? यामागे तीन कारण
Abhijeet Dipke-Rahul Gandhi
| Updated on: Oct 10, 2026 | 11:55 AM

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरु आहे. दुसरीकडे काँग्रेस सुद्धा निवडणूक आयोग आणि ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन करत आहे. दोन्ही पक्षांची एक समान मागणी आहे, ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा आणि SIR प्रोसेस रद्द करा. दोन्ही पक्ष विरोधी पक्षात आहेत. मात्र तरीही हे दोन्ही पक्ष एकत्र का आलेले नाहीत?. आज दिल्लीत जंतर-मंतरवर सीजेपीने आंदोलनाची हाक दिली आहे. त्यावेळी राहुल गांधी ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाला संबोधित करण्यासाठी चेन्नईला निघून गेले आहेत. सीजेपीच्या या आंदोलनाचं आतापर्यंत आम आदमी पार्टी, टीएमसी (ममता गट) आणि डाव्या पक्षांनी जाहीर समर्थन केलं आहे.

डावे आणि आपने जंतर-मंतरवर होणाऱ्या या आंदोलनाच सहभागी होण्याची घोषणा केली आहे. ज्ञानेशकुमार यांच्याविरोधात होणाऱ्या या आंदोलनात AAP चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आपल्या कुटुंबासह सहभागी होणार आहेत. शुक्रवार रात्रीपर्यंत हे स्पष्ट नव्हतं की ममता बॅनर्जी यांची पार्टी सीजेपीच्या आंदोलनात सहभागी होणार की नाही?. दिल्लीत दाखल होण्याआधी ममता बॅनर्जी पत्रकारांना म्हणाल्या की, जंतर-मंतरवर 10 ऑक्टोंबरला होणाऱ्या आंदोलनात त्या सहभागी होऊ शकतात. पण अजून काही ठरलेलं नाही हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं.

Loading...

शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागलेला

याआधी ममता बॅनर्जी यांचा तृणमुल काँग्रेस, आपने NEET-UG पेपर लीक प्रकरणात सीजेपीच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाला समर्थन दिलं होतं. त्यात सहभागी झाले होते. या आंदोलनामुळे धर्मेंद्र प्रधान यांना केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. काँग्रेस सीजेपीच्या आंदोलनापासून अंतर राखून आहे, यामागे काही कारणं आहेत.

काँग्रेस सीजेपीच्या आंदोलनापासून अंतर राखून आहे, यामागची तीन कारणं

पहिलं म्हणजे सीजेपीच्या आंदोलनात सहभागी झाल्यास सर्व श्रेय काँग्रेसला मिळणार नाही. त्यात सीजेपीला सर्वाधिक श्रेय जाईल.

दुसरं म्हणजे काँग्रेसला आम आदमी पार्टी कशी मोठी झाली याची पूर्ण कल्पना आहे. यामुळे दिल्लीत काँग्रेसच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालय. त्यामुळे आप सारखा सीजेपीची उदय काँग्रेसला नाही परवडणार.

तिसरं म्हणजे सीजेपीच्या आंदोलनात सहभागी झाल्यास अभिजीत दीपके मोठे होत जाणार. राहुल गांधी काँग्रेसचे भावी पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत. भावी पीएम म्हणून राहुल गांधींच्या इमेज बिल्डिंगला फटका बसू शकतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us