कुत्रे बाईकच्या मागे का धावतात? खरं कारण तुम्हालाही माहीत नसेल, वाचून बसेल धक्का
तुम्ही भारतामध्ये कोणत्याही गावात, शहरामध्ये जा, तुम्हाला एक गोष्ट पाहायला भेटते ती म्हणजे, तुम्ही जर गाडी चालवत असाल आणि त्या परिसरामध्ये कुत्रे असेल तर ते तुमच्या गाडीमागे पळते.

तुम्ही भारतामध्ये कोणत्याही गावात, शहरामध्ये जा, तुम्हाला एक गोष्ट पाहायला भेटते ती म्हणजे, तुम्ही जर गाडी चालवत असाल आणि त्या परिसरामध्ये कुत्रे असेल तर ते तुमच्या गाडीमागे पळते. इतरांच्या वाहनामागे देखील धावते. मात्र आश्चर्याची बाब ही आहे की तुम्ही रस्त्यानं चालले असाल तर काहीवेळा अपवाद वगळता कुत्रे तुमच्या मागे धावत नाही.काही वेळेला तर कुत्रे गाडीचा काही किलो मीटरपर्यंत देखील पाठलाग करतात. कुत्रे पाठिमागे धावल्यानं अनेकदा बाईकचा अपघात देखील होतो. साहाजिकच तुम्हालाही अनेकदा असा प्रश्न पडलाच असेल की कुत्रे बाईकमागे का धावतात? आज आपण त्याचं उत्तर जाणून घेणार आहोत.
कुत्रे तुमच्या गाडीमागे का पळतात त्या मागे असं काही निश्चित कारण नाहीये, कुत्रे तुम्हाला पाहून देखील गाडीच्या मागे पळत नाहीत. मात्र विज्ञान असं म्हणतं की तुमच्या कारच्या किंवा बाईकच्या टायरमधून जेव्हा दुसऱ्या कुत्र्याचा वास येतो त्यावेळी इतक कुत्रे आक्रमक होतात आणि ते तुमच्या गाडीच्या मागे पळतात.सर्वांनाच माहिती आहे की, कुत्र्यांची वास घेण्याची क्षमता ही इतर कुठल्याही प्राण्यांपेक्षा अधिक असते.त्यामुळेच पोलीस दलामध्ये देखील आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस कुत्र्यांची मदत घेतात. कुत्रे नुसत्या वासावरून देखील माणसाला ओळखतात.चाकामधून इतर कुत्र्यांचा वास आल्यामुळे कुत्रे आक्रमक होतात आणि भोकायला सुरुवात करतात.
दुसऱ्या कुत्र्यांच्या वासामुळे होतात आक्रमक
जर तुमची गाडी एखाद्या ठिकाणी उभी असेल तर अनेकदा कुत्रे गाडीच्या टायरवर लघवी करतात. जेव्हा ती गाडी घेऊन तुम्ही दुसऱ्या ठिकाणी जातात तेव्हा त्याचा वास हा तेथील कुत्र्यांना येतो. त्यांना वाटतं की आपल्या परिसरामध्ये हे नवीन कुत्रं आलं आहे. त्यामुळे ते आक्रमक होतात आणि गाडीचा पाठलाग करतात. अनेकदा तर काही कीलोमीटरपर्यंत कुत्रे गाडीचा पाठलाग करतात. यामुळे अपघाताचा देखील धोका वाढतो. अशाप्रकारे अनेकदा अपघात देखील होतात. कुत्र्याला वाचवण्याच्या नादात गाडी अनेकदा स्लीप होण्याची भीती असते.