स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न अजून का मिळाला नाही? मोहन भागवत स्पष्टच बोलले

मुंबईतील वरळी डोममध्ये संघाचे मनोमिलन सुरू आहे. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित आहेत. या कार्यक्रमामध्ये बोलताना देशातील विविध प्रश्नांवर मोहन भागवत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न अजून का मिळाला नाही? मोहन भागवत स्पष्टच बोलले
मोहन भागवत
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 08, 2026 | 3:27 PM

मुंबईतील वरळी डोममध्ये संघाचे मनोमिलन सुरू आहे. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित आहेत. या कार्यक्रमात बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी विविध प्रश्नांवर संघाची भूमिका व्यक्त केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे अशी मागणी होत आहे,  मात्र अजून त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाहीये. अजून सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार का मिळाला नाही? या प्रश्नाला उत्तर देताना मोहन भागवत यांनी मोठं विधान केलं आहे. त्या समितीत मी नाही, जर मला त्या समितीमधील कोणी  भेटलं तर त्यांना मी नक्की विचारेन, असं मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले मोहन भागवत? 

गेल्या अनेक वर्षांपासून स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न मिळावा अशी मागणी सुरू आहे, सध्या केंद्रात देखील भाजपची सत्ता आहे. मात्र तरी देखील सावकर यांना अजूनही भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाहीये. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार का दिला जात नाहीये? असा प्रश्न यावेळी मोहन भागवत यांना विचारण्यात आला, या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी मोठं विधान केलं आहे. सावरकर लाखो करोडो हृदयाचे सम्राट बनले आहेत. त्या समितीत मी नाही, जर कोणी त्या समितीमधलं मला भेटलं तर त्यांना मी नक्की विचारेन, असं यावेळी मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान भाजपची सत्ता आल्याने संघाला चांगले दिवस आलेत का? असा प्रश्नही यावेळी मोहन भागवत यांना विचारण्यात आला.  भाजप सत्तेत आल्यामुळे आमचे चांगले दिवस आले असं नाही याच्या  उलट आहे. आमची शक्ती आहे लोक आमचं ऐकतात, त्याचा फायदा त्यांना होतो, तसेच आमचं काम वाढलं आहे, त्यांनी आमची साथ दिली म्हणून त्यांना चांगले दिवस आले, असं यावेळी मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. आम्ही भाजपवर कोणताही दबाव टाकला नाही,
आमच्या संघाच्या शाखेत कोणतेही राजकारण होत नाही, असंही ते यावेळी म्हणाले.