अमेरिकेसोबत टॅरिफ वॉर सुरू असतानाच भारतात GST बद्दल मोठा निर्णय; नेमकी काय आहे मोदींची खेळी?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या 50% आयात शुल्काच्या निर्णयानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जीएसटी करात कपात करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. टॅरिफ वॉरमुळे मोदींनी हा निर्णय घेतला का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अमेरिकेसोबत टॅरिफ वॉर सुरू असतानाच भारतात GST बद्दल मोठा निर्णय; नेमकी काय आहे मोदींची खेळी?
Narendra Modi and Donald Trump
Image Credit source: Instagram
Updated on: Sep 10, 2025 | 3:52 PM

केंद्र सरकारकडून वस्तू आणि सेवा करातील (GST) करांमध्ये बदल करण्यात आला आहे. सरकारने हे कर चार स्तरांवरून दोन स्तरांवर आणले आहेत. येत्या 22 सप्टेंबरपासून पाच टक्के आणि 18 टक्के असे दोनच स्तर असणार आहेत. त्याचप्रमाणे अनेक वस्तूंवरील कर हा शून्य करण्यात आला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दरकपातीची घोषणा करताना म्हणाल्या, यापुढे जीएसटीचे फक्त दोन टप्पे राहतील. म्हणजेच 12 टक्के आणि 28 टक्के स्लॅब रद्द करण्यात आले आहेत. त्याऐवजी 5 टक्के आणि 18 टक्के कर लावण्यात आला आहे. एकीकडे केंद्र सरकार याला जीएसटीमधील एक मोठी सुधारणा म्हणत आहे. तर दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत सुरू असलेल्या ‘टॅरिफ वॉर’मुळे आणि बिहार निवडणुका तोंडावर आल्यामुळे केंद्र सरकारकडून ही भेट दिली जातेय का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. केंद्र सरकारच्या निर्णयावर प्रतिक्रिया भारतातील उद्योजक या निर्णयाकडे सरकारकडून मिळालेली भेट म्हणून पाहत आहेत. देशातील...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा