AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गिजर वापरत असाल तर सावध राहा… गॅस लिक झाल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक

बंगळुरूच्या अश्वथानगर भागात एक दुर्दैवी घटना घडल्याचे समोर आले आहे. एका 23 वर्षीय महिलेचा गॅस गीझरमधून निघालेल्या वायूमुळे मृत्यू झाला. त्यामध्ये तिचा ४ वर्षांचा मुलगाही गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. x

गिजर वापरत असाल तर सावध राहा...  गॅस लिक झाल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक
| Updated on: Dec 26, 2023 | 1:32 PM
Share

बंगळुरू | 26 डिसेंबर 2023 : थंडीच्या दिवसात गरम, कडकडीत पाण्याने अंघोळ करण्याची मजाच वेगळी असते. तुम्हीही गॅस गीझरचा वापर करता का ? त्याचं उत्तर हो असेल तर मग सावधानता बाळगण्याची गरज आहे. कारण गॅस गीझरचा नीट वापर केला नाही, योग्य ती काळजी घेतली नाही तर ते धोकादायक ठरू शकते. त्याचा एक धक्कादायक अनुभव बंगळुरूमध्ये घटना घडली. बंगळुरूच्या अश्वथानगर भागात एक दुर्दैवी घटना घडल्याचे समोर आले आहे. एका 23 वर्षीय महिलेचा गॅस गीझरमधून निघालेल्या वायूमुळे मृत्यू झाल्याचे उघड झाले. गॅस गीझरमधून निघालेल्या कार्बन मोनोऑक्साइडमुळे गॅसच्या संपर्कात आल्याने तिचा मृत्यू झाला.

दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ती महिला तेव्हा सहा महिन्यांची गर्भवती होती. ही घटना घडली तेव्हा ती तिच्या 4 वर्षांच्या मुलाला बाथरूममध्ये अंघोळ घालत होती. बाथरूममधील त्या वायूमुळे तिचा तर मृत्यू झालाच पण तिच्या मुलाची तब्येतही अतिशय गंभीर आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी ही दुर्दैवी घटना घडली. पीडित महिला रम् हिचायाचा पती जगदीश घरी परतला असता मुख्य दरवाजा बंद असल्याचे त्याला दिसले. वैकुंठ एकादशी असल्याने संध्याकाळी मंदिरात जाऊन असे रम्याला तिच्या पतीने सांगितले होते, म्हणूनच ती तिच्या लहान मुलाला अंघोळ घालत होती. पण तेव्हाच ते दोघेही बेशु्द्ध पडले, असे पोलिसांनी सांगित

पूर्वसंध्येला हे जोडपे मंदिरात जाण्याचा विचार करत होते. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, “जगदीशने राम्याला सांगितले होते की, ते वैकुंठ एकादशीच्या पूर्वसंध्येला मंदिरात भेट देतील. त्यानुसार राम्याने सम्राटला आंघोळीसाठी नेले, पण दोघेही बेशुद्ध पडले.”

बराच वेळ कोणी दरवाजाच उघडला नाही

रम्याचा पती घरी आल्यावर त्याला दार बंद दिसले. तो बराच वेळ दार ठोठावत होता, पण कोणीच उघडले नाही. अखेर त्याने खिडकीतून डोकावून पाहिले. त्याला बाथरूममध्ये पाणी वाहत असल्याचा

आवाज आला आणि दरवाजा किंचित उघडा होता. अखेर त्याने जोर लावून दरवाजा तोडला असता त्याला त्याची पत्नी आणि मुलगा बेशुद्ध पडलेले दिसले, असे पोलिसांनी सांगितले.

गॅस गिझरशी संबंधित अशी अनेक प्रकरणे यापूर्वीही समोर आली आहेत. काही महिन्यांपूर्वी, बेंगळुरूच्या चिक्काजाला परिसरात राहत असलेले आणखी एक जोडपे गॅस गिझरमधील बिघाडामुळे मृत्यूमुखी पडले होते. मध्ये बिघाड झाल्यामुळे मृतावस्थेत सापडले होते. बाथरूममध्ये विषारी धूर लीक होत असेल आणि त्यासंदर्भात योग्य काळजी घेतली नाही तर घातक परिणाम होऊ शकतात. जर बाथरूम योग्यरित्या हवेशीर नसेल तर परिस्थिती घातक ठरू शकते, असा इशारा पोलिसांनी दिला.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?