AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मेहंदी लावल्यानंतर अंघोळीला गेली, दीड तासानंतरही बाहेर आली नाही, दरवाजा तोडताच जे दिसलं ते…

एक 26  वर्षांची महिला केसांना मेहंदी लावून अंघोळीला गेली पण दीड तास होऊनही ती बाहेर न आल्याने कुटुंबियांनी बाथरूचा दरवाजा तोडला. मात्र आतमधील दृश्य पाहून ते हादरलेच.

मेहंदी लावल्यानंतर अंघोळीला गेली, दीड तासानंतरही बाहेर आली नाही, दरवाजा तोडताच जे दिसलं ते...
| Updated on: Jan 19, 2024 | 8:37 AM
Share

भोपाळ | 19 जानेवारी 2024 : मध्य प्रदेशातील भोपाळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक 26  वर्षांची महिला केसांना मेहंदी लावून अंघोळीला गेली पण दीड तास होऊनही ती बाहेर न आल्याने कुटुंबियांनी बाथरूचा दरवाजा तोडला. मात्र आतमधील दृश्य पाहून ते हादरलेच. समोर त्यांची मुलगी बेशुद्धावस्थेत जमिनीवर पडली होती. कुटुंबियांनी ताताडीने तिला रुग्णालयात दाखल केले, पण तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. एकच कल्लोळ माजला. तरूण लेकीचा अकस्मात मृत्यू झाल्याने कुटुंबियांवर आकाश कोसळले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

राजधानीतील अशोक गार्डन परिसरातील ही दुर्दैवी घटना आहे. 26 वर्षांची पूर्वा साहू ही नेटलिंक कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर होती. पूर्वाचे सासर उज्जैनमध्ये असून तिचा नवरा आशिष साहू व्यवसायाने केमिकल इंजिनिअर आहे. पूर्वा आणि आशिष काही काळापासून गाझियाबादला राहत होते. मात्र गेल्या 6 महिन्यांपासून तिचा नवरा, आशिष हा नोकरीननिमित्त फ्रान्सला गेला होता. त्यामुळे पूर्वादेखील तिच्या तान्ह्या मुलीसह भोपाळला माहेरी आली होती. वर्क फ्रॉम होम संपल्यानंतर ती भोपाळजवळील इंटस्ट्रिअल एरिआ मंडीदीप येथील कंपनीत नोकरीसाठी जाऊ लागली.

नेमकं काय झालं ?

पूर्वाचं सासर उज्जैन येथील असून 6 फेब्रुवारीला तिच्या दिराचं लग्न होणार होतं. त्यासाठी पूर्वाचा पती हा 22 जानेवारी रोजी भारतात येणार होता. सध्या माहेरी राहणारी लग्नाच्या तयारीत व्यस्त होती. कगेल्या मंगळवारी दुपारी तिने केसांना मेंदी लावली आणि ती गच्चीवर उन्हात जाऊन बसली. थोड्या वेळाने ती खाली आली आणि अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेली. पण दीड तास उलटूनही ती बाहेर न आल्याने कुटुंबियांना काळजी वाटली. त्यांनी बाथरूमचं दार ठोठावलं पण काहीच रिप्लाय आला नाही.

अखेर त्यांनी जोर लावून बाथरूमचा दरवाजा उघडला. आतमध्ये पाहिलं तर पूर्वा बाथरूममध्ये जमीनीवर बेशुद्धावस्थेत खाली कोसळली होती , तिच्या नाकातून रक्तही येतं होतं.हे पाहून सगळेच टेन्शनमध्ये आले, पण त्यांनी तातडीने तिला हॉस्पिटलमध्ये हलवलं. पण तिथे डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. तरण्या लेकीचा अकस्मात मृत्यूमुळे तिच्या माहेरच्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला. तिच्या मृत्यूची बातमी सासरी समजल्यावर तिथेही कल्लोळ माजला.

लेकीचा पहिला वाढदिवस येणारच होता

या घटनेमुळे सर्वजण धक्क्यात आहेत. पूर्वाची लेक खूप लहान असून पुढच्याच महिन्यात तिचा पहिला वाढदिवस येणार होता, ती एक वर्षांची होईल. त्यामुळे पूर्वा आणि तिचा पती आशिष खूप उत्साहित होते, त्यांनी सेलिब्रेशनसाठी प्लानिंगही केले होते. पण त्यापूर्वी का

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.