भाचा नजरेत भरला, त्याच्यासाठी नवऱ्याला तडपवून, तडपवून मारलं, इलेक्ट्रिक शॉक दिले, मग त्याच्यासमोरच दोघांनी..
अनैतिक संबंधात माणूस कुठल्या टोकाला जाईल ते सांगता येत नाही. एका ताज्या प्रकरणात पत्नीने भाच्याला मिळवण्यासाठी लग्नाच्या नात्याची पर्वा केली नाही. नवऱ्यावर इतके अत्याचार केले की, क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडल्या.

विवाहाच्या नात्यात फक्त पती-पत्नी एकत्र येत नाहीत. दोन कुटुंब जोडली जातात. सगळ्या कुटुंबाला एकत्र बांधणं ही त्या जोडप्याची जबाबदारी असते. विश्वास हा लग्नाच्या नात्याचा पाया असतो. पण काहीवेळा लग्न संस्थेवरचा विश्वास उडावा अशा घटना घडतात. या पवित्र नात्याला कलंक लागतो. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जवळपास सहावर्षांपूर्वी विवाहाच्या सप्तपदीने एका पवित्र नात्याची सुरुवात झाली होती. पण शेवट खूप भयानक झाला. अक्षरश: अंगावर काटा येईल. भाच्याच्या प्रेमात एक महिला आंधळी झाली. तिने तिची बहिण आणि प्रियकर भाच्याच्या मदतीने मार्गात अडसर ठरणाऱ्या पतीचा काटा काढला. या महिलेने क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमधील हे धक्कादायक प्रकरण आहे.
ही घटना कुठल्या तात्काळ रागाची प्रतिक्रिया नव्हती. खूप थंड डोक्याने कारस्थान रचून हा गुन्हा करण्यात आला आहे. मझोला पोलिसांच्या चौकशीतून हे समोर आलय. आरोपींनी पीडित पतीला आधी बंधक बनवून ठेवलं. अनेक तास त्याचा छळ केला. क्रौर्याच्या सर्व सीमा ओलांडताना त्याला विजेचे झटके दिले. एवढ सर्व करुनही मन भरलं नाही, तेव्हा पत्नीने प्रियकर आणि तिच्या बहिणीच्या मदतीने नवऱ्याला विष गिळायला भाग पाडलं.
त्यांना कुठे अडकायचं नव्हतं, म्हणून..
इतक्या क्रूर पद्धतीने गुन्हा केल्यानंतर आरोपींना स्वत:ची सुटका करुन घ्यायची होती. त्यांना कुठे अडकायचं नव्हतं. म्हणून मृतदेह पायऱ्यांवरुन खाली फेकला. जेणेकरुन हत्या आत्महत्या वाटावी. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात लोकांमध्ये चिंता आणि चीड या भावना आहे. आपल्याच जवळच्या माणसांनी हे भयानक कृत्य केलं. पोलिसांनी या प्रकरणात चार आरोपींना अटक करुन तुरुंगात पाठवलं आहे.
रशीने बांधून त्याला निदर्यतेने मारहाण
त्या भयानक रात्रीचं सत्य उलगडताना मृत व्यक्तीचा नातेवाईक कुलदीप ठाकूरच्या डोळ्यात पाणी होतं. चारही आरोपींनी मिळून जवळपास तीन सात पीडित पतीला त्रास दिला. त्याच्यावर अत्याचार केले. रशीने बांधून त्याला निदर्यतेने मारहाण केली. त्याच्या शरीरावर बऱ्याच जखमा होत्या. खूप रक्त वाहून गेलेलं.
विष पाजून तोंडात कपडा भरला
वीजेचा धक्का लागून मृत्यू झालाय हे दाखवण्याचं प्लानिंग केलेलं. त्यासाठी पीडित व्यक्तीला शॉक दिले. त्यानंतर जबरदस्तीने विष पाजून तोंडात कपडा भरला. जेणेकरुन त्याने कुठला आरडाओरडा करु नये. परिसरात लोकांनी दोन अज्ञात लोकांना पळून जाताना पाहिलं, तेव्हा संशय बळावला. नातेवाईक घरी आले, त्यावेळी पीडित रक्तबंबाळ अवस्थते जमिनीवर पडलेला होता. त्याचं शरीर थंड पडलेलं. युवकाला रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी आरोपी पत्नीने काहीतरी कारण शोधून लोकांना रोखण्याचा प्रत्न केला. जेणेकरुन कारस्थान उघड होऊ नये. आंचल असं मृताच्या पत्नीच नाव आहे. तिची बहिण शिखा आणि त्यांचे दोन साथीदार अंकित आणि अजयने मिळून हे भयानक कृत्य केलं. या दोन्ही युवकांसोबत दोन्ही बहिणींचे संबंध होते.
