जगातील सर्वात मोठा मुस्लिम देश; जीथे पर्यटकांना भाड्यानं मिळते बायको, ‘असा’ होतो करार
एक काळ असा होता की हा देश हिंदू राजांचा देश होता. हिंदू राजे या देशावर राज्य करत होते. या देशातील बहुसंख्य लोक हे हिंदू होते.

एक काळ असा होता की हा देश हिंदू राजांचा देश होता. हिंदू राजे या देशावर राज्य करत होते. या देशातील बहुसंख्य लोक हे हिंदू होते. मात्र त्यानंतर काळ बदलला. येथील राजाने आपला धर्म बदला. राजाने मुस्लिम धर्म स्विकारला. त्यानंतर पाहाता पाहाता हा संपूर्ण देशच मुस्लिम बनला. येथील प्रजेनं देखील मुस्लिम धर्माचा स्वीकार केला. हा देश आता चर्चेत येण्याचं कारण म्हणजे इथे एक नवी प्रथा सुरू झाली आहे. आनंद विवाह अर्थात प्लेजर मॅरेज. ही लग्नाची अशी पद्धत आहे, ज्यामध्ये देश फिरण्यासाठी आलेल्या एखाद्या पर्यटकासोबत 15 ते 20 दिवस लग्न केलं जातं,त्यानंतर लग्नाचा करार संपवला जातो. त्यानंतर पुन्हा एकदा नव्या पर्यटकासोबत लग्न केलं जातं.
आज आपण ज्या देशाबद्दल माहिती घेणार आहोत त्याचं नाव आहे, इंडोनेशिया इंडोनेशिया हा जगातील सर्वात मोठा मुस्लिम देश आहे. या देशात दरवर्षी मोठ्या संख्येनं पर्यटक येत असतात. येथील महिला त्या पर्यटकांसोबत दहा ते पंधरा दिवसांसाठी लग्न करतात, या लग्नाला प्लेजर मॅरेज अर्थात आनंद विवाह असं नाव देण्यात आलं आहे.
इंडोनेशियामध्ये ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे कमी आहे, अशा कुटुंबातील मुली पर्यटकांसोबत लग्न करतात. दहा ते पंधरा दिवसांसाठी हा करार असतो. करार संपुष्टात आल्यानंतर पुन्हा एकदा नव्या पर्यटकासोबत लग्न केलं जातं. या लग्नाचा उद्देश पर्यटकांना आनंद देऊन त्याच्या बदल्यात पैसे कमावने हा आहे. त्यामुळेच याला आनंद विवाह असं म्हटलं जातं. मुताह निकाह नावाने ओळखली जाणारी ही प्रथा आता या देशात सर्वात जास्त पैसे कमावून देणारा उद्योग बनला आहे. अर्थव्यवस्थेला देखील चालना मिळत आहे.
कसा चालतो व्यवसाय?
देशात येणाऱ्या पर्यटकांना आनंद देण्यासाठी आणि त्यातून पैसे कमावण्यासाठी अशा पद्धतीचं लग्न केलं जातं. मुस्लिमांमध्ये याला अस्थायी विवाह असं देखील म्हटलं जातं. या व्यवसायात काही एजेंट असतात, त्यातील प्रत्येक एजेंट हा दर महिन्याला अशा पद्धतीनं 25 लग्न जमवू शकतो. सध्या इंडोनेशियामध्ये हा बिझनेस मोठ्याप्रमाणात सुरू आहे.
