UP Elections 2022: योगींनी शेअर केले मोदींसोबतचे फोटो, कोणत्या विषयावर चर्चा? चर्चांना उधाण

| Updated on: Dec 24, 2021 | 2:55 PM

पुढील वर्षी यूपीमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. यूपीचे मुख्यमंत्री योगी आणि पीएम मोदी निवडणुका जिंकण्यासाठी सतत रॅली, पायाभरणी, लोकपर्ण सोहळे आणि बरेच कार्यक्रमं आयोजित करत आहेत. उत्तर प्रदेश हे भारतातील सर्वात मोठे आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे राज्य आहे.

UP Elections 2022: योगींनी शेअर केले मोदींसोबतचे फोटो, कोणत्या विषयावर चर्चा? चर्चांना उधाण
योगींनी कुठून लढायचं याचा निर्णय भाजपा हायकमांड घेणार
Follow us on

लखनऊः उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचे दोन फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो काही मिनीटात सोशल मीडियावर व्हायरल झाले. या फोटोंमध्ये पीएम मोदी सीएम योगींच्या खांद्यावर हात ठेवून चालत आहेत आणि दोघांमध्ये काहीतरी चर्चा होतेय असं दिसतंय. उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्यापुर्वी हे फोटो शेअर केले गेले आहेत. योगींनी जी कॅपशन लिहिले आहे, ते नक्कीच काही राजकीय संकेत देत ​​आहे. सर्व पक्ष निवडणुकीच्या रणनीतीमध्ये व्यस्त असताना हे फोटो शेअर करण्यात आले आहेत. योगींच्या या ट्विटमुळे राजकीय अर्थांना उधाण येणार हे नक्की.

योगींनी लिहिले, ‘आम्ही नवस करून, शरीर आणि मन अर्पण करून निघालो आहोत. सूर्योदय करायचा आहे, अंबरापेक्षा उंच जायचं आहे, नवा भारत घडवायचा आहे.’

भाजपच्या अनेक नेत्यांनी हे फोटो शेअर केले आणि योगींच्या आणि मोदींच्या समोर दुसरा कोणताही राजकीय पक्ष जिंकू शकत नाही यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भर दिला. बलियाचे खासदार आणि भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष वीरेंद्र सिंह मस्त यांनीही हा फोटो शेअर केला आहे. त्यांनी लिहिले की, ‘तुम्ही कितीही कष्ट करा, भाजपच जिंकणार आहे. फोटो शेअर करत माहिती सल्लागार शलभ मणी त्रिपाठी यांनी लिहिले, ‘तुम्ही कधीही थकणार नाही, तुम्ही कधीही थांबणार नाही, कर शपथ, कर शपथ, कर शपथ, अग्निपथ अग्निपथ!

निवडणुकीची तयारी

पुढील वर्षी यूपीमध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. यूपीचे मुख्यमंत्री योगी आणि पीएम मोदी निवडणुका जिंकण्यासाठी सतत रॅली, पायाभरणी, लोकपर्ण सोहळे आणि बरेच कार्यक्रमं आयोजित करत आहेत. उत्तर प्रदेश हे भारतातील सर्वात मोठे आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे राज्य आहे. भाजपसाठी उत्तर प्रदेशातील सत्ता टिकवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोगी सरकारने तीन शेती कायदेही मागे घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी लखनऊमध्ये होते. पोलीस महासंचालकांच्या परिषदेत ते सहभागी झाले होते. यादरम्यान नक्षलवादी हिंसाचार, दहशतवादी मॉड्यूल्सवर कारवाई आणि सायबर सुरक्षा या मुद्द्यांवर ठळकपणे चर्चा झाली. यादरम्यान पंतप्रधान अधिवेशनातही उपस्थित राहिले होते.

हे ही वाचा

VIDEO: रझा अकादमी काँग्रेसच्या काळातच पोलिसांवर हल्ले का करते? अकादमीवर बंदी घालण्याची हिंमत आहे का?; फडणवीसांचा सवाल

PHOTOS: INS विशाखापट्टणम भारतीय नौदलात सामील, अँटी-सबमरीन रॉकेट लाँचर्स आणि सेन्सरने सुसज्ज स्वदेशी युद्धनौ

मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपची मोठी खेळी, विनोद तावडेंवर नवीन जबाबदारी, जे. पी. नड्डांकडून नियुक्ती