VIDEO: रझा अकादमी काँग्रेसच्या काळातच पोलिसांवर हल्ले का करते? अकादमीवर बंदी घालण्याची हिंमत आहे का?; फडणवीसांचा सवाल

रझा अकादमी काँग्रेसच्या काळातच पोलिसांवर हल्ले का करते? रझा अकादमी ही कोणाची बी टीम आहे? असा सवाल करतानाच रझा अकादमीवर बंदी घालण्याची काँग्रेसमध्ये हिंमत आहे का? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

VIDEO: रझा अकादमी काँग्रेसच्या काळातच पोलिसांवर हल्ले का करते? अकादमीवर बंदी घालण्याची हिंमत आहे का?; फडणवीसांचा सवाल
Devendra fadnavis


अमरावती: रझा अकादमी काँग्रेसच्या काळातच पोलिसांवर हल्ले का करते? रझा अकादमी ही कोणाची बी टीम आहे? असा सवाल करतानाच रझा अकादमीवर बंदी घालण्याची काँग्रेसमध्ये हिंमत आहे का? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन हा सवाल केला. काँग्रेसच्या काळातच रझा अकादमी पोलिसांवर हल्ले का करते? मुंबईत अशा प्रकारची दंगल झाली होती. तेव्हा रझा अकादमीने पोलिसांवर हल्ले केले होते. त्यावेळीही काँग्रेसचेच सरकार होते. त्यामुळे रझा अकादमी कुणाची बी टीम आहे, कुणीची ए टीम आहे आणि कुणाचं पिल्लू आहे हे सर्वांना माहीत आहे. तुम्हाला वाटतं ना रझा अकादमी भाजपची बी टीम आहे. तर आम्ही रझा अकादमीवर बंदी घालण्याची मागणी करतो. आहे का हिंमत? काँग्रेसमध्ये आहे का हिंमत? असा सवाल फडणवीसांनी केला.

फेक न्यूजवर मोर्चे कोणी काढले?

समाजात एक नरेटिव्ह तयार करण्याकरिता समाजाला भडकवण्यता आलं. जी घटना घडलीच नाही त्याच्यासाठी मोर्चे काढण्यात आले. एवढे मोठे मोर्चे राज्याच्या वेगवेगळ्या शहरात निघतात हे आता ठरवलं आणि निघाले असं होत नाही. हे सुनियोजित मोर्चे होते. एकाच वेळी एकाच दिवशी हे मोर्चे निघाले. त्यावरून हा सुनियोजित कट होता हे दिसून येते. त्यामुळे फेक न्यूजच्या आधारे मोर्चे कोणी काढले? त्याची चौकशी करा. त्यांची या मागची भूमिका काय होती हे सत्य समोर येऊ द्या, अशी मागणीही त्यांनी केली.

मते कमी होतील म्हणून ठाकूर बोलत नाहीत का?

यशोमती ठाकूर 12 तारखेच्या घटनेवर का बोलत नाहीत? त्यांची मते कमी होणार म्हणून त्या बोलत नाहीत का? लांगूलचालून करण्यासाठी त्या बोलत नाहीत का? की या मोर्च्यांची माहिती होती म्हणून त्यात बोलत नाहीत का? असा सवाल करतानाच राज्यात दंगल भडकणव्यासाठी तयार करण्यासाठीचा कट होता का त्याची चौकशी व्हावी. 12 तारखेला असाच मोर्चा अमरावतीत निघाला. त्याला परवानगी होती की नाही? होती तर कुणी दिली? ज्यांनी परवानगी दिली त्याने काय विचार करून दिली? त्याची चौकशी झाली पाहिजे. परतीच्या वेळी समाजकंटकांनी दुकाने टार्गेट केली. लोकांना टार्गेट केलं. यातून दंगा घडवायचा होता. त्यामुळे विशिष्ट धर्माच्या दुकानांना घरांना व्यापाऱ्यांना टार्गेट करण्यात आलं, असं त्यांनी सांगितलं.

केवळ हिंदुत्वाद्यांना टार्गेट केलं जातंय

13 तारखेच्या घटनेला जे जबाबदार नाहीत, त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. केवळ हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित असल्याच्या कारणावरूनच कारवाई केली जात आहे, असं सांगतानाच 13 तारखेचा बंद हा भाजपनेच पुकारला होता. 13 तारखेची घटना ही 12 तारखेच्या घटनेची प्रतिक्रिया होती, असंही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

12 तारखेची हिंसा डिलीट करून 13 तारखेच्या घटनेवर जोर का दिला जात आहे?, यशोमती ठाकूर गप्प का?; देवेंद्र फडणवीसांचा सवाल

मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपची मोठी खेळी, विनोद तावडेंवर नवीन जबाबदारी, जे. पी. नड्डांकडून नियुक्ती

ST Strike| आंदोलन दडपणे सुरू, 40 कर्मचाऱ्यांना डांबले, हिंसक वळण लागेल; भाजप नेते दरेकरांचा सरकारला इशारा

एकाचवेळी मोर्चे कसे निघाले?, राज्यातील घटना सुनियोजित कट, हिंसेची चौकशी करा; देवेंद्र फडणवीस यांची मागणी

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI