मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपची मोठी खेळी, विनोद तावडेंवर नवीन जबाबदारी, जे. पी. नड्डांकडून नियुक्ती

भाजपनं विनोद तावडे यांना महाराष्ट्रासाठी विनोद तावडे यांना राष्ट्रीय महामंत्री करत असल्याचं जाहीर केलं आहे. याशिवाय बिहारसाठी ऋतुराज सिन्हा, झारखंडसाठी आशा लाकडा यांची राष्ट्रीय मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपची मोठी खेळी, विनोद तावडेंवर नवीन जबाबदारी, जे. पी. नड्डांकडून नियुक्ती
विनोद तावडे
Follow us
| Updated on: Nov 21, 2021 | 1:59 PM

मुंबई: भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी आज काही संघटनात्मक नियुक्त्या केल्या आहेत. भाजपनं महाराष्ट्रातील नेते विनोद तावडे यांना महाराष्ट्रासाठी विनोद तावडे यांना राष्ट्रीय महामंत्री करत असल्याचं जाहीर केलं आहे. याशिवाय बिहारसाठी ऋतुराज सिन्हा, झारखंडसाठी आशा लाकडा यांची राष्ट्रीय मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. पश्चिम बंगालसाठी भारती घोष यांची राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून आणि शहजाद पुनावाला यांची राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून नियुक्ती केली आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे.

विनोद तावडे यांच्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी

2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं विनोद तावडे यांना उमेदवारी दिली नव्हती. त्यानंतर ते काही काळ बाजूला गेल्याचं चित्र निर्माण झालं होतं. त्यानंतर विनोद तावडे यांचा राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश केल्यानंतर त्यांच्याकडे हरियाणाचे प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. आता त्यांना महाराष्ट्रासाठी राष्ट्रीय महामंत्री करत भाजपनं पुन्हा एकदा बळ देण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जातंय. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विनोद तावडे यांची नियुक्ती महत्त्वाची असल्याचं बोललं जातंय.

विनोद तावडे कोण आहेत?

अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थी चळवळीतून पुढे आलेला, संघाच्या मुशीत घडलेला अत्यंत महत्त्वाकांक्षी, तेवढाच बुद्धिमान आणि धूर्त नेता म्हणून विनोद तावडे यांची ओळख आहे. विनोद तावडे यांनी 1985 पासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून कामाला सुरुवात केली. यानंतर विनोद तावडे यांनी एकएक पायरी चढत महाराष्ट्र भाजपमधील प्रमुख नेत्यांच्या पंक्तीत स्थान मिळवले.

नितीन गडकरी आणि गोपीनाथ मुंडे या दोन बड्या नेत्यांच्या सावलीत राहून विनोद तावडे यांनी भाजपमध्ये स्वत:चे भक्कम स्थान निर्माण केले. 1995 मध्ये राज्यात युतीचे सरकार आले तेव्हा भाजपच्या वर्तुळात विनोद तावडे यांच्याभोवती प्रचंड वलय होते. मात्र, 2014 पासून विनोद तावडे यांच्याभोवतीचे हे वलय हळूहळू फिकट व्हायला सुरुवात झाली. शिक्षणमंत्री म्हणून त्यांचे अनेक निर्णय आणि वक्तव्ये वादग्रस्त ठरली  होती.

इतर बातम्या:

एकतर्फी कारवाई केली तर जेलभरो आंदोलन करू, अमरावती हिंसाचारप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांचा इशारा

ST Strike| आंदोलन दडपणे सुरू, 40 कर्मचाऱ्यांना डांबले, हिंसक वळण लागेल; भाजप नेते दरेकरांचा सरकारला इशारा

BJP National President J P Nadda appoint Vinod Tawde as Rashtriya Mahamantri for Maharashtra

Non Stop LIVE Update
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.