एकतर्फी कारवाई केली तर जेलभरो आंदोलन करू, अमरावती हिंसाचारप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांचा इशारा

शहरातील पोलीस राजकीय दबावापायी एकतर्फी कारवाई करत असून त्यांचे धोरण असेच राहिले तर आम्हाला निषेध करावा लागेल, आम्ही जेलभरो आंदोलन करू, असा इशारा फडणवीस यांनी दिला आहे.

एकतर्फी कारवाई केली तर जेलभरो आंदोलन करू, अमरावती हिंसाचारप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांचा इशारा
देवेंद्र फडणवीस यांचा अमरावती प्रशासनाला इशारा
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मंजिरी धर्माधिकारी

Nov 21, 2021 | 1:41 PM

अमरावतीः शहरात 12 आणि 13 नोव्हेंबर रोजी झालेल्या हिंसक कारवायांमध्ये (Amaravati Riots) फक्त भाजप कार्यकर्त्यांनाच दोषी धरून त्यांच्यावरच कारवाई केली जात असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. अमरावती दौऱ्यावर असताना फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी हे वक्तव्य केले आहे. अमरावती शहरातील पोलीस राजकीय दबावापायी एकतर्फी कारवाई करत असून त्यांचे धोरण असेच राहिले तर आम्हाला निषेध करावा लागेल, विरोध करावा लागेल. अमरावती पोलीस आणि प्रशासनाच्या या धोरणाचा निषेध म्हणून आम्ही जेलभरो आंदोलन करू, असा इशारा फडणवीस यांनी दिला आहे.

अमरावतीत तणावपूर्ण शांतता, आज सातवा दिवस

सात दिवसांच्या संचारबंदीनंतर आज अमरावती शहरात तणावपूर्ण शांतता दिसून आली. अत्यावश्यक कामांकरिता प्रशासनाने दिलेल्या वेळेत नागरिकांना बाहेर पडण्यासाठी तसेच दुकाने उघडण्यासाठी परवानगी दिली जात आहे. 12 नोव्हेंबर रोजी त्रिपुरा येथील कथित हिंसाचार प्रकरणी शहरात मोठ्या जमावाने मोर्चा काढत दुकानांची तोडफोड केली होती. या घटनेचा निषेध म्हणून 13 नोव्हेंबर रोजी शहरात भाजपच्या वतीने बंद पुकारण्यात आला होता. या दिवशीदेखील एक मोठा जमाव रस्त्यावर उतरत त्यांनीही हिंसक कारवाया घडवून आणल्या. त्यानंतर शहर पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर भाजप कार्यकर्ते आणि नेत्यांची धरपकड केली. यात माजी मंत्री अनिल बोंडेंचाही समावेश आहे. अनिल बोंडे यांनीच हिंसाचार घडवून आणल्याचा आरोप सत्ताधारी पक्षांकडून करण्यात येत आहे. या सर्वांचा निषेध आज देवेंद्र फडणवीस यांनी केला. शहरातील प्रशासनाला 12 नोव्हेंबर रोजी काय घडले, कोणी घडवले, याचा विसर पडला असून केवळ 13 नोव्हेंबर रोजी घडलेल्या प्रकारावरच कारवाई केली जात आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला.

एकतर्फी कारवाई बंद करा- फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती शहर प्रशासानला इशारा दिला आहे. पोलिसांनी राजकीय दबावाखाली फक्त भाजपविरोधी कारवाई केली तर आम्ही या घटनांचा निषेध करू. आम्ही जेलभरो आंदोलन करू. खोट्या गुन्ह्यात अडकवायचेच असेल तर आम्ही स्वतः तुरुंगात येतो. असा इशारा फडणवीस यांनी दिला आहे. या सर्व प्रकाराची माहिती गृहमंत्र्यांना देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

इतर बातम्या-

12 तारखेची हिंसा डिलीट करून 13 तारखेच्या घटनेवर जोर का दिला जात आहे?, यशोमती ठाकूर गप्प का?; देवेंद्र फडणवीसांचा सवाल

ST Strike| आंदोलन दडपणे सुरू, 40 कर्मचाऱ्यांना डांबले, हिंसक वळण लागेल; भाजप नेते दरेकरांचा सरकारला इशारा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें