AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahua Moitra : राजकारणात असून तुम्ही अंड्यांना घाबरता, स्वातंत्र्य..महुआ मोइत्रा यांना सुप्रीम कोर्टाकडून झटका

Mahua Moitra : जून महिन्यात महुआ मोइत्रा यांनी सोशल मीडियावर दोन व्हिडिओ पोस्ट केले होते. त्यावरुन एका भाजपं नेत्याने त्यांच्याविरोधात दाखल केलेल्या एका तक्रारीवरुन एफआयआर दाखल झाली.

Mahua Moitra :  राजकारणात असून तुम्ही अंड्यांना घाबरता, स्वातंत्र्य..महुआ मोइत्रा यांना सुप्रीम कोर्टाकडून झटका
Mahua Moitra
| Updated on: Aug 07, 2026 | 3:40 PM
Share

सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी तृणमुल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांच्या याचिकेवर सुनावणी करताना एक टिप्पणी केली. तुम्ही एक खासदार आहात आणि राजकारणात आल्यानंतर तुम्ही अंड्यांना घाबरता असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं. महुआ मोइत्रा यांच्या एका फेसबुक पोस्ट विरोधात एफआयआर दाखल झाला आहे. सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाने महुआ मोइत्रा यांना दिलासा देण्यास नकार दिला. तृणमुल काँग्रेसला सर्वोच्च न्यायालयाने झटका दिला. तुम्ही खासदार आहात. राजकारणात आल्यानंतर अंड्यांना घाबरता. आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी तर छातीवर गोळ्या खाल्ल्या आहेत. अशा याचिका तर या कोर्टासमोर आल्याच नाही पाहिजेत. पोलीस स्टेशनमध्ये जाताना अंडी फेकली जाऊ शकतात ही त्यांची भिती न्यायाधीश दीपांकर दत्ता आणि न्यायाधीश शील नागू यांच्या खंडपीठाने फेटाळून लावली.

जून महिन्यात महुआ मोइत्रा यांनी सोशल मीडियावर दोन व्हिडिओ पोस्ट केले होते. त्यावरुन एका भाजपं नेत्याने त्यांच्याविरोधात दाखल केलेल्या एका तक्रारीवरुन एफआयआर दाखल झाली. भाजपं समर्थक कृष्णानगर कोर्टाबाहेर त्यांच्यावर अंडी आणि टॉमेटो फेकण्यासाठी जमा झाले होते. त्यावेळी मोइत्रा यांच्याविरुद्ध एक एफआयआर दाखल झाली. मागच्या महिन्यात एफआयआर रद्द करण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर हाय कोर्टाने त्यांना अंतरिम सुरक्षा दिली. पण 14 ऑगस्टला तपास अधिकाऱ्यासमोर हजर होण्याचे निर्देश दिले.

कोर्टाला मोइत्रा यांचं म्हणणं पटलं नाही

सुप्रीम कोर्टात मोइत्रा यांच्यावतीने सीनियर एडवोकेट गोपाल शंकरनारायणन यांनी युक्तीवाद केला. एका फेसबुक पोस्टमुळे मोइत्रा यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल झाल्याचं त्यांनी सांगितलं. वीडियो-कॉन्फ़्रेंसिंगच्या माध्यमातून तपास अधिकाऱ्यासमोर हजर होण्याची परवानगी मिळाली पाहिजे. कोर्टाने त्यांच्या या मागणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. कोर्टने विचारलं, वर्चुअली का?. तुम्ही खासदार आहात म्हणून का?. त्यावर त्यांचे वकील शंकरनारायणन म्हणाले की, पोलिसांसमोर फिजिकली हजर झाल्या, तर त्यांच्यावर जमावाकडून हल्ला होऊ शकतो. त्या म्हणाल्या की, मी याआधी तिथे गेली, त्यावेळी मला धमक्या दिल्या, माझ्यावर अंडी फेकली. कोर्टाला मोइत्रा यांचं म्हणणं पटलं नाही. कोलकाता उच्च न्यायालयाने आधीच त्यांना तपास यंत्रणांना सहकार्य करायला सांगितलं आहे.

Follow Us
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात...
Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात याचा अहवाल महिनाभरातच; AAIBचं आश्वासन
मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात...
Mumbai Bank Election : मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची एन्ट्री; सहकार क्षेत्रात रंगणार चुरस
भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, अन्...
Bhandara : भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, धक्काबुक्की अन् थेट... VIDEO चर्चेत
आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
Sanjay Raut on Shivsena : आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
Farmer Loan : 5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत मोठा घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका!
Nashik : मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका! नाशिकमध्ये दोन मोठे प्रश्न ऐरणीवर
दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना, VIDEO व्हायरल
Nanded : दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना दिसले, VIDEO व्हायरल; बैठकीच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह
टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा...
Sanjay Raut on Sanjay Shirsat : टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा मला काही त्रास नाही राऊतांचा मिश्किल टोला
गणपती विसर्जनाबाबत महापौर तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या
Ritu Tawde : गणपती विसर्जनाबाबत महापौर रितू तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या?
ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल
Ambadas Danve : ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल; पुढे म्हणाले...