UP Murder : प्रेमाच्या त्रिकोणातून विटेने ठेचून तरुणाची हत्या; रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह

रविवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थांना नादिरचा रक्ताने माखलेला मृतदेह पलका कालव्याजवळील बाजपेयी यांच्या शेतात पडलेला आढळला. ग्रामस्थांनी त्याबाबत नादिरच्या कुटुंबीयांना माहिती दिली. नादिरची हत्या झाल्याचे उघड होताच एकच खळबळ उडाली.

UP Murder : प्रेमाच्या त्रिकोणातून विटेने ठेचून तरुणाची हत्या; रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह
प्रेमाच्या त्रिकोणात विटेने ठेचून मारले
Image Credit source: tv9
| Updated on: Apr 25, 2022 | 1:22 AM

लखनऊ : उत्तर प्रदेशात गुन्हेगारी थांबण्याचे नाव घेत नाहीय. लखनऊमध्ये आणखी एका हत्याकांडा (Murder)चा उलगडा झाला आहे. गुडंबा येथील पालका कालव्याजवळ रविवारी सकाळी मोहम्मद नादिर (25) या तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नादिरला विटेने ठेचून ठार करण्यात आले. मृत तरुण हा व्यवसायाने सुतार होता. कुटुंबीयांनी त्याच्या एका साथीदाराविरुद्ध तक्रार दाखल केली. त्याआधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक (Arrest) केली आहे. प्रेमाच्या त्रिकोणातून हे हत्याकांड घडल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नादिरची हत्या प्रेमाच्या त्रिकोणातून झाली. गुडंबा येथील भाखमाळ गावात मोहम्म्द नादिर हा चार भाऊ आणि आई सैदुन जहाँ यांच्यासोबत राहत होता. नादिर सुताराचे काम करत असे. नादिरचा भाऊ आरिफने पोलिसांत दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास नादिर बेहटा मार्केटमध्ये काही सामान आणण्यासाठी गेला होता. त्याच्यासोबत गावातील तौफिक उर्फ ​​भादुवाही गेला होता. मात्र नादिर बाजारातून मागे घरी परतलाच नाही. कुटुंबीयांनीही त्याचा शोध घेतला मात्र कोणताही सुगावा लागला नाही. त्यामुळे सर्वत्र शोधाशोध सुरु झाला होता.

कालव्याजवळील शेतात आढळला मृतदेह

रविवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थांना नादिरचा रक्ताने माखलेला मृतदेह पलका कालव्याजवळील बाजपेयी यांच्या शेतात पडलेला आढळला. ग्रामस्थांनी त्याबाबत नादिरच्या कुटुंबीयांना माहिती दिली. नादिरची हत्या झाल्याचे उघड होताच एकच खळबळ उडाली. नादिर त्यांच्या कुटुंबातील सर्वात लहान होता. घटनेची माहिती मिळताच परिसरातील लोकांनी नादिरच्या घरी धाव घेतली. नादिरच्या कुटुंबात आरिफ, खालिक, हाशिम, कादिर आणि आई सैदुन जहाँ असे भाऊ आहेत.

आरोपी आणि मृत तरुणाचे एकाच मुलीवर प्रेम

नादिरच्या हत्येप्रकरणी त्याचा भाऊ आरिफ याने तौफिक उर्फ ​​भदुआ आणि त्याच्या इतर साथीदारांविरुद्ध खुनाचा आरोप केला आहे. त्यावरून पोलिसांनी आरोपी तौफीक उर्फ ​​भदुवा याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आणि पाच तासांच्या आत तौफीक याला अटक करण्यात आली. चौकशीत तौफीकने गुन्ह्याची कबुली दिली. नादिर व तौफीकचे एकाच मुलीवर प्रेम होते. काल रात्री दोघे पलका कालव्याजवळ दारू प्यायले. त्यानंतर प्रेम प्रकरणावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादात तौफिकने नादिरचा विटेने खून केला.

इतर बातम्या

Hariyana Crime : चालत्या ट्रेनमध्ये कबड्डीपटू मुलीवर अत्याचार; हरयाणातील धक्कादायक घटना

Lakhimpur Kheri Violence : लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरण : मंत्रिपुत्र आशिष मिश्रा पुन्हा तुरुंगात