AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video किती धक्कादायक आहे बघा… प्रचंड वादळाने तरुण हवेत उंच उडाला अन् थेट शेतात… काय झालं त्या तरुणाचं..

उत्तर प्रदेशमध्ये निर्सगाचे थैमान बघायला मिळाले. पावसासह चक्रीवादळ आले आणि काही क्षणातच होत्याचे नव्हते झाले. लोक या चक्रीवादळात ठार झाले. जनावरे दगावली. यादरम्यानच एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्याने काळजा ठोका चुकत आहे.

Video किती धक्कादायक आहे बघा... प्रचंड वादळाने तरुण हवेत उंच उडाला अन् थेट शेतात... काय झालं त्या तरुणाचं..
Uttar Pradesh cyclone video
| Updated on: May 14, 2026 | 1:42 PM
Share

उत्तर प्रदेशमध्ये चक्रीवादळासह निसर्गाचा कोप बघायला मिळाला. 89 लोकांचा जीव गेला. कित्येक लोक गंभीर जखमी आहेत. 100 हून अधिक जणावरे दगावली. घरांचे मोठे नुकसान झाले. या चक्रीवादळादरम्यान लोक जिथे आसरा मिळेल, तिथे स्वत: ची जीव वाचवत लपून बसले. यादरम्यानच काही धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका व्हिडीओमध्ये चक्क पत्राच्या शेडसोबत एक तरुण हवेत उडताना दिसला. मात्र, सुरूवातीला हा व्हिडीओ एआयच्या मदतीने केल्याचे सांगितले जात होते. मात्र, व्हायरल होणारा हा व्हिडीओ फेक नाही किंवा एआयच्या मदतीने तयार करण्यात आला नाहीये. पत्राच्या शेडसोबत हवेत उडणारा तरुणाचा हा व्हिडीओ खरा आहे. 50 फूट ऊंच हा तरुण उडाला. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यातील आहे.

या घटनेनंतर तरुण एका शेतात फेकला गेला. तो गंभीर जखमी आहे. ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी या पत्राच्या शेडमध्ये तीन लोक लपून बसले होते. मात्र, अचानक हे पत्राचे छत उडाले आणि याच्यासोबत तरुण हवेतच उडाला. कितीतरी फूट हवेत उडाल्यानंतर तो तरुण थेट शेतात जाऊन पडला. या घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने तरुणाला उपचाराकरिता रूग्णालयात दाखल केले.

उत्तर प्रदेशमध्ये चक्रीवादळ आणि पावसाने थैमान घातले. काल रात्री पाऊस वाऱ्यासह एक धक्कादायक रूप निसर्गाचे बघायला मिळाले. या चक्रीवादळात झाडे रस्त्यावर पडल्याने महामार्ग अनेक भागात बंद आहेत. जिल्हाधिकारी अविनाश सिंग यांनी अधिकाऱ्यांना सूचना देत अलर्ट राहण्यास सांगितले. प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. लोकांना तात्काळ मदत पोहोचवण्याच्या सूचनाही देण्यात आल्यात.

लोकांना राहण्यासाठी घरे नाहीत. या चक्रीवादळात अनेकांनी घरे पडली आहेत. जनावरे दगावली आहेत. लोक मोठ्या प्रमाणात या चक्रीवादळात गंभीर जखमी झालीत. सध्या त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहे. इतके मोठे चक्रीवादळ धडकेल याचा साधा कोणी विचारली केला नव्हता. मोठे नुकसान झाले. या चक्रीवादळात मृत झालेल्या व्यक्तींचा आकडा तात्काळ सांगणे कठीण असल्याचे प्रशासनाने म्हटले. सध्याच्या परिस्थितीमध्ये 89 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

Follow Us
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा