कावड यात्रेत 81 लिटरची कावड घेऊन हरिद्वारावरून निघाली तरुणी , म्हणाली माझा बॉयफ्रेंड…, कारण ऐकताच लोकांनी केला फुलांचा वर्षाव
जूनचा महिना आता संपत आला आहे, जुलैचा महिना उद्यापासून सुरू होईल, जुलै महिन्याच्या 11 तारखेपासून कावड यात्रेला प्रारंभ होणार आहे, याच दरम्यान ही घटना समोर आली आहे.

जूनचा महिना आता संपत आला आहे, जुलैचा महिना उद्यापासून सुरू होईल, जुलै महिन्याच्या 11 तारखेपासून कावड यात्रेला प्रारंभ होणार आहे. श्रावणाचा महिना महादेवांना समर्पित आहे. कावड यात्रेदरम्यान विविध प्रकारच्या, आकाराच्या, रंगाच्या कावडी पाहायला मिळतात. आपली इच्छा पूर्ण व्हावी यासाठी अनेक भक्त कावड यात्रा करतात. याच कावड यात्रेदरम्यान ही घटना घडली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मुजफ्फरनगरमधील एक मुलगी आपल्या बॉयफ्रेंडसाठी कावड घेऊन हरिद्वारला निघाली आहे. लक्ष्मी असं या मुलीचं नाव आहे. ती मेरठच्या परतापूर येथील रहिवासी आहे. जाणून घेऊयात हे प्रकरण नेमकं आहे तरी काय?
मेरठच्या परतापूर येथील रहिवासी असलेली लक्ष्मी आपल्या बॉयफ्रेंडसाठी कावड घेऊन हरिद्वारला निघाली आहे. तीच्या प्रियकराला नोकरी लागत नाहीये, त्यासाठी आपण ही कावड घेऊन गंगेचं पाणी आणण्यासाठी हरिद्वारला आल्याचं तीने म्हटलं आहे. लक्ष्मी आपली मैत्रीण मानसीसोबत हरिद्वारला आली आहे, तीने हरिद्वारवरून तब्बल 81 लिटर वजनाची कावड घेऊन आपल्या गावाकडे प्रस्तान केलं आहे. हे जल मी महादेवांना अर्पण करेल आणि माझ्या प्रियकराला नोकरी मिळू दे यासाठी प्रार्थना करेल असं लक्ष्मीने यावेळी सांगितलं.
मार्गामध्ये ठिकठिकाणी लक्ष्मीचं स्वागत होत आहे, तिच्यावर फूलांची उधळण होत आहे. ती आपल्या प्रियकरासाठी करत असलेले कष्ट पाहून अनेकांना तर आपले अश्रू देखील रोखता आले नाही. ती हरिद्वारवरून 81 लिटर गंगा जल घेऊन परत निघाली आहे. भारतीय सैन्यदलात भरती होण्याचं माझ्या प्रियकराचं स्वप्न आहे.त्याचं हे स्वप्न लवकरात लवक पूर्ण व्हाव यासाठी मी हे गंगा जल महादेवांना अर्पण करणार आहे, माझ्या प्रियकरासाठी प्रार्थना करणार आहे, अशी माहिती यावेळी लक्ष्मीने दिली. लक्ष्मीचं मार्गातील प्रत्येक गावामध्ये जंगी स्वागत होत आहे.
ती हरिद्वारवरून आणलेलं हे जल महादेवांना अर्पण करणार आहे. आपल्या प्रियकरासाठी प्रार्थना करणार आहे. त्याला लवकरात लवकर नोकरी लागावी हे आपलं स्वप्न असल्याचं तीने यावेळी म्हटलं आहे.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
