Corona In UK : ब्रिटनमध्ये एकाच दिवसात लाखांहून अधिक कोरोनाबाधित! नव्या वर्षात लॉकडाऊनचं संकट?

| Updated on: Dec 23, 2021 | 9:59 PM

ब्रिटन(UK)मध्ये कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंट(Delta Varient)नं हाहाकार उडवून दिलाय. त्यातच ओमिक्रॉन (Omicron)विषाणूचा वेगानं प्रसार होत असल्यानं गेल्या २४ तासांत तब्बल 1,06,122 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेत.

Corona In UK : ब्रिटनमध्ये एकाच दिवसात लाखांहून अधिक कोरोनाबाधित! नव्या वर्षात लॉकडाऊनचं संकट?
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us on

ब्रिटन(UK)मध्ये कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंट(Delta Varient)नं हाहाकार उडवून दिलाय. त्यातच ओमिक्रॉन (Omicron)विषाणूचा वेगानं प्रसार होत असल्यानं गेल्या २४ तासांत तब्बल 1,06,122 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेत. एका दिवसात आढळून येणारा कोरोनाबाधिताचा रेकॉर्डब्रेक आकडा आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढल्यानं आरोग्य व्यवस्थेवरही प्रचंड ताण निर्माण झालाय. कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्यानं आरोग्य कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झालीय.

संसर्गात वाढ
रुग्णालयातील बहुतांश कोरोनाबाधित हे लस न घेतलेलेच आहेत. त्यामुळे ब्रिटनमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी बूस्टर डोसची आणि लसीकरणाची मोहीम राबवण्यात येतेय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही ब्रिटनमध्ये सर्वाधिक 68, 000 कोरोनाबाधित आढळले होते. मात्र, ओमिक्रॉन विषाणूमुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढलीय. ओमिक्रॉनमुळे संसर्ग दीड ते तीन दिवसांत दुप्पटीनं वाढत असल्यानं कोरोनाच्या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज राहा, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेच्या युरोप विभागाच्या संचालकांनी दिलाय.

इंपिरियल कॉलेजचा अभ्यास
ब्रिटनमध्ये कोरोनानं हाहाकार माजवला असतानाच ओमिक्रॉन संदर्भात आणखी माहिती उपलब्ध झालीय. लशींचे दोन्ही मात्रा घेतल्यानंतर डेल्टा व्हायरसच्या तुलनेत ओमिक्रॉनमुळे रुग्णालयात भरती होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण अंत्यत कमी असल्याचं लंडनमधील इंपिरियल कॉलेजच्या अभ्यासात दिसून आलंय.

जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा
लशीचे दोन्ही डोस ओमिक्रॉनपासून बचाव करू शकतात. श्रीमंत देशांमध्ये सरसकट बूस्टर डोस देण्याचा कार्यक्रम राबवल्यास कोरोनाविरुद्द लढाई जास्त काळ चालेल, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिलाय. लस वितरणातील असमानता दूर केल्यास जगातून २०२२पर्यंत कोरोना हद्दपार होऊ शकतो, असा दावाही WHOनं केलाय. अमेरिकेतही ओमिक्रॉनमुळे एकाच आठवड्यात सहापट कोरोनाचे रुग्ण आढळलेत. जगभरात कोरोनाचे संकट पुन्हा एकदा वाढल्यानं नव्या वर्षाची सुरुवात निर्बंधानं होण्याची शक्यता वाढलीय.

ऑलिम्पिकमुळे संसर्ग वाढण्याची शक्यता
चीनमध्ये हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. चीननं कोरोनाविरोधातील झिरो टॉलरन्स धोरणाअंतर्गत 1 कोटी 13 लाख लोकसंख्या असलेल्या झियान शहरात लाकडॉऊन लागू केलाय. तर दक्षिण कोरियातही कोरोनामुळे गेल्या 24 तासांत 109 कोरोनाबळी गेल्यानं प्रशासन सतर्क झालंय. दर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेतील ओमिक्रॉन संसर्गाची लाट ओसरलीय.

‘पॅक्सलोव्हिड’ला मंजुरी
कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे जगभरात चिंता वाढलेली आहे. ब्रिटन, अमेरिकासह युरोपनंतर आता भारतातही ओमिक्रॉनचा संसर्ग वाढलाय. ओमिक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी पॅक्सलोव्हिड औषधाला आपत्तकालिन वापरास अमेरिकेनं मंजुरी दिलीय. Paxlovid औषधामुळे रुग्णालयात भरती होण्याचं प्रमाण नगण्य आहे विशेष म्हणजे जीवसुद्धा वाचतो.

Uddhav Thackeray : अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिसले! मोठ्या शस्त्रक्रियेनंतर मुख्यमंत्र्यांचा फोटो समोर

Omicron : चिंता वाढली; राज्यात ओमिक्रॉन रुग्णांची उच्चांकी नोंद, दिवसभरात 23 नवे रुग्ण आढळले!

Intrest Rate : निवृत्तीत ‘आधार’ काठी; 8 वर्षात रक्कम दामदुप्पट, पीपीएफपेक्षा अधिक व्याज, जाणून घ्या पर्याय