AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Intrest Rate : निवृत्तीत ‘आधार’ काठी; 8 वर्षात रक्कम दामदुप्पट, पीपीएफपेक्षा अधिक व्याज, जाणून घ्या पर्याय

पीपीएफ(PPF) ऐवजी स्वेच्छिक भविष्यनिर्वाह निधी (व्हीपीएफ-VPF) तुमच्यासाठी स्वावलंबनाचा ‘अर्थमार्ग’ ठरू शकतो. पीपीएफपेक्षा अधिक व्याज व्हीपीएफवर मिळू शकते. तुम्हाला नव्याने खाते उघडण्याची आवश्यकता नाही. यावर मिळणारं व्याज सेक्शन 80सी अंतर्गत करमुक्त आहे.

Intrest Rate : निवृत्तीत ‘आधार’ काठी; 8 वर्षात रक्कम दामदुप्पट, पीपीएफपेक्षा अधिक व्याज, जाणून घ्या पर्याय
गुंतवणुकीचे पर्याय, प्रातिनिधिक छायाचित्र
| Edited By: Pradeep Garad | Updated on: Dec 23, 2021 | 7:32 PM
Share

नवी दिल्ली : तुम्ही नोकरदार आहात? निवृत्तीनंतर इतरांच्या आधाराविना स्वावलंबीपणे जीवन जगू इच्छिता? तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. निवृत्तीनंतर आर्थिक सक्षमतेसाठी भविष्य निर्वाह निधीचा (पीपीएफ-PPF) पर्याय अनेकजण स्वीकारतात. परंतु, पीपीएफ ऐवजी स्वेच्छिक भविष्यनिर्वाह निधी (व्हीपीएफ) तुमच्यासाठी स्वावलंबनाचा ‘अर्थमार्ग’ ठरू शकतो. पीपीएफपेक्षा अधिक व्याज व्हीपीएफवर मिळू शकतं. तुम्हाला नव्याने खाते उघडण्याची आवश्यकता नाही. विशेष म्हणजे व्हीपीएफ खात्यावर मिळणारे व्याज सेक्शन 80सी अंतर्गत करमुक्त आहे. भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ-PPF) हा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचा (ईपीएफओ-EPFO) उपक्रम आहे. याद्वारे कर्मचारी आपल्या वेतनातील काही हिस्सा याप्रकारच्या निधीमध्ये जमा करू शकतात. व्हीपीएफमध्ये कर्मचारी आपल्या मूळ वेतनाच्या 100 टक्के योगदान देऊ शकतात.

व्हीपीएफ अप, पीपीएफ डाउन :

आजमितीला पीपीएफच्या तुलनेत व्हीपीएफवर अधिक व्याज मिळतो. पीपीएफवर 7.1 टक्के तर व्हीपीएफ वर 8.50 टक्के व्याज मिळतं. तुम्ही यामध्ये तुमच्या गुंतवणुकीच्या प्रमाणात आवश्यकतेनुसार बदल करू शकतात आणि तुमच्या निर्णयाप्रमाणे बंदही करू शकतात. पीपीएफमध्ये एका वर्षात अधिकतम 1.50 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करण्याची मर्यादा आहे. व्हीपीएफमध्ये गुंतवणुकीची कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही.

व्हीपीएफचे लाभ : – व्हीपीएफवर ईपीएफ प्रमाणेच व्याज मिळतं. – नोकरी बदलल्यानंतर व्हीपीएफ फंड ट्रान्सफर करू शकतात. – व्हीपीएफ आयकर अधिनियम कलम 80सी अनुसार कर कपातीसाठी पात्र आहे. – व्हीपीएफमध्ये रक्कम काढण्यासाठी ऑनलाइन क्लेम करता येतो. – व्हीपीएफमधून आंशिक स्वरुपात पैसे काढण्यासाठी खातेधारकाला नोकरीत पाच वर्षे पूर्ण करणं आवश्यक आहे. त्यापूर्वी रक्कम काढल्यास कर आकारणी केली जाते. – व्हीपीएफची संपूर्ण रक्कम केवळ निवृत्तीनंतर मिळू शकते.

पीपीएफ 10 वर्षात दामदुप्पट :

गुंतवणूक विश्वात ‘रूल ऑफ 72’ विशेष नियम आहे. तुमच्या गुंतवणुकीचा दामदुप्पट कालावधी यामुळे तुम्हाला कळू शकेल. 72 संख्येला व्याजदराने भागल्यास मिळणारं उत्तर दामदुप्पट कालावधी दर्शवितो.

पीपीएफ : नियम 72

• गृहीत व्याजदर- 7.1टक्के/प्रति वर्ष • दामदुप्पट कालावधी- 72/7.1= 10.14 वर्षे

तुमचे पैसै पीपीएफमध्ये 10.14 वर्षात दामदुप्पट होतील.

व्हीपीएफ 8 वर्षात दामदुप्पट :

व्हीपीएफ – नियम 72 • गृहीत व्याजदर- 8.50टक्के/प्रति वर्ष • दामदुप्पट कालावधी- 72/8.50= 8.47

तुमचे पैसे व्हीपीएफमध्ये 8.47 वर्षात दामदुप्पट होतील. पीपीएफच्या तुलनेत व्हीपीएफमध्ये 1.67 वर्षापूर्वीच पैसे दामदुप्पट होतात.

Motorcycles India : TVS मोटरनं लाँच केली अपाची आरटीआर 165 RP लिमिटेड एडिशन, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

Sensex : ‘ओमिक्रॉन’चं मळभ हटलं; शेअर बाजारात तेजी, 385 अंकांनी वधारला सेन्सेक्स

Air Purifier : फिलिप्सनं सादर केला 3 इन 1 प्युरिफायर, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?