Pednekar vs Shelar: किशोरी पेडणेकर आणि आशिष शेलारांच्या वादाचे विधानसभेत पडसाद, देवेंद्र फडणवीस आक्रमक

निलंबनामुळे सभागृहात नसणाऱ्या आशिष शेलारांची बाजू मांडण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस चांगलेच आक्रमक झाले. पोलिसांनी कारवाई केली पण ती परिपूर्ण झालीय असं वाटत नाही.

Pednekar vs Shelar: किशोरी पेडणेकर आणि आशिष शेलारांच्या वादाचे विधानसभेत पडसाद, देवेंद्र फडणवीस आक्रमक
किशोरी पेडणेकर आणि आशिष शेलारांच्या वादाचे विधानसभेत पडसाद
| Edited By: | Updated on: Dec 24, 2021 | 12:42 AM

मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि आशिष शेलार यांच्यातील वादाचे पडसाद आज विधानसभेत उमटले. शिवसेना आमदार सुनील प्रभूंनी किशोरी पेडणेकरांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या शेलारांविरोधात कारवाईची मागणी केली. मात्र निलंबनामुळे सभागृहात नसणाऱ्या आशिष शेलारांची बाजू मांडण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस चांगलेच आक्रमक झाले. पोलिसांनी कारवाई केली पण ती परिपूर्ण झालीय असं वाटत नाही. आधी वादग्रस्त विधान आणि मग धमकीचं पत्र या दोन्ही गोष्टी दोन्हीचं उत्तर गृहमंत्र्यांनी द्यावं, असे सुनील प्रभू म्हणाले.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

सुनील प्रभू वक्तव्यानंतर देवेंद्र फडणवीस चांगलेच आक्रमक झाले होते. प्रकरण कोर्टात आहे, इथे चर्चा का ? असा सवाल करीत शेलारांवर बोलता मात्र बालकांच्या मृत्यूवर का बोलत नाही? तिथे अश्रू नाही येत का? भ्रष्टचारी आहेत भ्रष्टाचारी. भांडुपच्या सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये चार बालकांचा मृत्यू झालाय. वातानुकूलित यंत्रात शॉर्ट सर्किट झालं. त्यामुळं बालकं गेलीत. मुंबई पालिककडे 50 हजार कोटींच्या ठेवी आहेत. अशा घटना का घडतात. लहान बालके गेलीत याला कारणीभूत कोण आहे? दिवसाढवळ्या या बालकांचा खून झालाय, असे फडणवीसांनी सुनील प्रभूंना दिलेल्या प्रत्युत्तरात म्हटले आहे.

अजय चौधरींच्या वक्तव्यानंतर आणखी गोंधळ

सभागृहातील वातावर आधीच तापलेलं असताना शिवसेना आमदार अजय चौधरींच्या वक्तव्यानं त्यात आणखीच फोडणी पडली. भाजपच्या महिलांचा विषय असेल तेव्हाच का बोंबलता या चौधरींच्या वक्तव्यावर आक्षेप घेत भाजप आमदार चांगलेच भडकले. तर महिलांवरील तक्रारीच्याबाबतीत दुटप्पी भूमिकेनं कारवाई. एका राजकीय पक्षाच्या नेत्यानं महिलेविषयी नको तो शब्द वापरला. मात्र, त्यावेळी अधिकारी राजकीय आंधळेपणानं वागतात, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले. दरम्यान, मुंबई महापालिका निवडणूक अगदी काही महिन्यांवर येऊन ठेपलेय. त्यामुळे पेडणेकर विरूद्ध शेलार वादानं मुंबईतील राजकारण मात्र चांगलंच तापलंय. (Dispute between Kishori Pednekar and Ashish Shelar reverberates in Assembly)

इतर बातम्या

Corona In UK : ब्रिटनमध्ये एकाच दिवसात लाखांहून अधिक कोरोनाबाधित! नव्या वर्षात लॉकडाऊनचं संकट?

Goa Elections 2022: गोव्यात आप आणि तृणमूल एकत्र लढणार का? वाचा काय म्हणाले केजरीवाल